शहरातील एटीएममध्ये "नो कॅश' 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

नागपूर - अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर खरेदीचा आनंद लुटण्यासाठी निघालेल्या नागपूरकरांना आज एटीएममधून रोख रक्कम काढण्यासाठी चांगलीच पायपीट करावी लागली. शहरातील अनेक एटीएमसमोर सलग दुसऱ्या दिवशी "नो कॅश', एटीएमची सेवा खंडित असे फलक पाहायला मिळत होते. त्यामुळे अनेकांनी मुहूर्ताची खरेदीसाठी प्लास्टिक मनीचा वापरावर अधिक भर दिला. 

नाशिक येथील टांकसाळीतील शाई संपल्यामुळे गेल्या काही महिन्यापासून फक्त 50 टक्केच नोटांची छपाई होत होती. देवासमध्येही नोटांची छपाईवर निर्बंध आणले होते. त्यामुळे देशात सर्वत्र नोटांच्या टंचाई जाणवू लागली. परिणामी, रिझर्व्ह बॅंकेकडून अर्थपुरवठा होत नसल्याने बॅंकांकडे ग्राहकांना द्यायला पुरेशी रोकड उपलब्ध झाला नाही. रोकड उपलब्ध होत नसल्याने एटीएममध्ये रक्‍कम भरणे कठीण झाले आहे. 

भारतीय रिझर्व्ह बॅंकेकडून (आरबीआय) बॅंकांच्या करन्सी चेस्टला होणारा अर्थपुरवठा अनियमित होत असल्याचा दावा कालपर्यंत केला होता. त्यातच ग्राहकही रोख रक्कम आपल्याकडेच साठवून ठेवत आहेत. त्यामुळे चलनाकरिता रोख रकमेसाठी बॅंकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. बॅंक प्रशासनाकडूही आरबीआयकडून पुरेशा प्रमाणात रोकड येत नसल्याची तक्रार आहे. एटीएममध्ये पुरेसे पैसे नसल्याने काही बॅंकांनी एटीएममधून पैसा काढण्याच्या मर्यादा लावल्या आहेत. शहरात एजीएस, सेक्‍शन वेल, रायटर आणि बॅंकॉम या कंपन्यांच्या माध्यमातून एटीएममध्ये रोख रकमेचा भरणा करण्यात येते. त्यातील एजीएस या कंपनीकडे असलेल्या एटीएममध्ये रोख रक्कम असून उर्वरित कंपन्यांच्या एटीएममधील रोख रक्कम संपल्याचे चित्र आहे. 

Web Title: No Cash in ATM