ग्रामीण भागातील "एटीएम' ठणठण 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

गडचिरोली - काही दिवसांपासून ग्रामीण भागातील "एटीएम' पैशांअभावी ठणठणाट आहेत. पैसे काढण्यासाठी नागरिकांना बॅंकेतही तासन्‌तास रांगेत उभे राहावे लागते. याचा ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून संताप व्यक्त केला जात आहे. 

धानोरा, आरमोरी, एटापल्ली, आष्टी, अहेरी, चामोर्शी, भामरागड, देसाईगंज तसेच जिल्हा मुख्यालयातही विविध बॅंकांच्या शाखा असून या शाखांमार्फत ग्राहकांच्या सोयीसाठी एटीएमची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र, अनेक दिवसांपासून या एटीएममध्ये पैसेच नसल्याने एटीएम सेवा नावापुरतीच उरली आहे. त्यामुळे खातेदारांची प्रचंड गैरसोय होत असून पैशांअभावी मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे. 

जिल्हा मुख्यालयातून रोकड उपलब्ध होत नसल्याचे कारण सांगून एटीएममध्ये अनेक दिवसांपासून रोकड टाकण्यात आली नाही. परिणामी रक्कम काढण्यासाठी आलेल्या अनेक ग्राहकांना आल्यापावली परत जावे लागत आहे. त्यामुळे बॅंकांमध्ये पैसे काढण्यासाठी ग्राहकांच्या मोठ्या रांगा लागलेल्या दिसून येत आहेत. एटीएममध्ये रोकड नसल्याने बचत खाते असलेल्या ग्राहकांना बॅंकेत जाऊन पैसे काढणे फारच त्रासाचे होत आहे. 

Web Title: No cash in ATM