
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावर भाजप विनाकारण आकांडतांडव करत आहे. हा मुद्दा सभागृहात उपस्थित करून त्यांनी सभागृहाचा वेळ वाया घालविला. राहुल गांधी यांचे वक्तव्य एका पार्श्वभूमीवर समजून घ्यायला हवा. फक्त वाद घालून चालणार नाही. आम्हीसुद्धा त्यांना सभागृहात तोडीस तोड उत्तर दिले.
नागपूर : महाविकास आघाडीत कोणत्याही प्रकारचा वाद नाही. आम्ही समन्वयाने कामाला सुरुवात केली आहे. तसेच लवकरच मंत्रिमंडळ विस्तार देखील होणार आहे, अशी स्पष्टोक्ती माजी मुख्यमंत्री व आमदार अशोक चव्हाण यांनी दिली.
16 डिसेंबर हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे यादिवशी आपल्या सैन्याने पाकिस्तानवर विजय मिळवला होता आणि इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वात बांगलादेशची निर्मिती झाली होती. वास्तविक पाहता विरोधी पक्षाने हा दिवस पाळायला हवा होता. तशी अपेक्षा आमची होती. पण त्यांनी हा दिवस न पाळता वेगळ्याच मुद्द्यांवर सभागृहात गोंधळ घातला. राहुल गांधी या सभागृहाचे सदस्य नाहीत. तरीदेखील या सभागृहात विरोधी पक्षाने वाद उत्पन्न केला, हे योग्य नाही.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावर भाजप विनाकारण आकांडतांडव करत आहे. हा मुद्दा सभागृहात उपस्थित करून त्यांनी सभागृहाचा वेळ वाया घालविला. राहुल गांधी यांचे वक्तव्य एका पार्श्वभूमीवर समजून घ्यायला हवा. फक्त वाद घालून चालणार नाही. आम्हीसुद्धा त्यांना सभागृहात तोडीस तोड उत्तर दिले.
महत्त्वाची बातमी - सावरकरांच्या मुद्द्यावरून वातावरण तापले
सावरकरांच्या मुद्यावरून सभागृहात विरोधकांचा गोंधळ
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात केलेल्या विधानाचे पडसाद हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात पडले. सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अभिनंदन प्रस्तावानंतर लगेच विरोधीपक्षाने आक्रमक भूमिका घेत सभागृहात गोंधळ घातला. यावेळी भाजप आमदारांनी सभागृहात बॅनर झळकवित राहुल गांधी मुर्दाबाद अशा घोषणा देत गोंधळ घातला. सावरकरांबद्दल बोलू देत नसलेले सरकार हे इंग्रजांचे सरकार आहे काय, असा सवालही विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. याच मुद्द्यावरून सभागृहाचे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूबही करावे लागले होते.
हेही वाचा - हिवाळी अधिवेशन : ही ब्रिटिशांची विधानसभा आहे का? : देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस यांपी व्यक्त केली तीव्र नाराजी
महाविकास आघाडीच्या पहिल्याच हिवाळी अधिवेशनाची सुरुवात प्रथेप्रमाणे "वंदे मातरम्'ने झाली. त्यानंतर लगेच देवेंद्र फडणवीस यांनी सर्व कामकाज बाजूला ठेवून चर्चेची मागणी केली. परंतु, संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन आणि देशाचे सरन्यायाधीश झालेले महाराष्ट्राचे सुपुत्र शरद बोबडे यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावानंतर आपले मुद्दे मांडण्याची सूचना विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. हा प्रस्ताव एकमताने संमतही करण्यात आला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सावरकर यांचे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदान मांडत कॉंग्रेस नेत्याने त्यांचा अपमान केल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.