विद्यापीठाच्या परीक्षा भवनात नाही पिण्याचे पाणी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

अभियंता विभागाचे दुर्लक्ष - दोन दिवसांत वॉटरकुलर सुरू करण्याचे प्र-कुलगुरूंचे आदेश 

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा भवनात स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याचे येथील कर्मचारी बाहेरून पिण्याच्या पाण्याच्या ‘कॅन’ मागवित येत  आहेत. मात्र, कामानिमित्त परिसरात येणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांचे बरेच हाल होत आहे. दरम्यान, यासंदर्भात प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी अभियंत्यांना दोन दिवसांत वॉटरकुलर  सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. 

साधारणत: उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने दिवसात किमान तीन ते चार लिटर पाण्याची गरज भासते. विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयात एक्‍वागार्डसह वॉटर कुलर लावण्यात येतात. मात्र, विद्यापीठाच्या परीक्षा भवनात पिण्याच्या पाण्याची सोय नाही. चार मजली परीक्षा भवनात व्यावसायिक व सामान्य परीक्षा, मॉडरेशन कक्ष, परीक्षा नियंत्रकाचे कार्यालय, गोपनीय विभाग, स्ट्राँगरूम, ऑनस्क्रीन मूल्यांकन कक्ष आणि पीएच.डी विभागाचा समावेश आहे.

त्यामुळे दररोज दोनशे ते अडीचशे कर्मचारी तसेच शिक्षक आणि विद्यार्थी असे पाचशे ते सहाशे नागरिक दररोज या परिसरात येतात. भरउन्हातून येणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांसह कर्मचाऱ्यांसाठीही पिण्याच्या पाण्याची सोय नसते.

विशेष म्हणजे परीक्षा भवनात परीक्षा नियंत्रक कार्यालय, गोपनीय विभाग आणि स्ट्राँगरूममध्ये वॉटर कुलर लावण्यात आले आहे. यापैकी गोपनीय आणि स्ट्राँगरूममधील वॉटर कुलर बंद अवस्थेत आहे. स्ट्राँगरूममधील वॉटर कुलरचा ॲक्वागार्डही खराब झालेला आहे. यावर्षीही  परीक्षा नियंत्रकांकडून सूचना देणयात आली. त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.  यंदा कर्मचाऱ्यांनी स्वत:साठी पिण्याच्या पाण्याची ‘कॅन’ मागविण्यास सुरुवात केली. येणाऱ्या- जाणाऱ्या महाविद्यालयातील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना त्यातूनच पाणी दिले जाते हे विशेष.  सध्या विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा सुरू असल्याने परीक्षा भवनात बराच वेळ कर्मचारी कामावर असतात. अशावेळी त्यांना पिण्याचे स्वच्छ पाणीही मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये कमालीचा रोष आहे. दरम्यान, शुक्रवारी प्र-कुलगुरूंनी यासंदर्भात अभियंत्यांची झडती घेत, लवकरात  लवकर कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिलेत. 

अभियंता विभागाला परीक्षा विभागात खराब झालेल्या वॉटर कुलरबद्दल माहिती दिली आहे. पाच  ते सात स्मरणपत्र देण्यात आले आहे. अद्याप ते दुरुस्त झालेले दिसून येत नाही. त्यामुळेच कदाचित ही परिस्थिती ओढवली आहे.
- डॉ. नीरज खटी, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ.

Web Title: no drinking water in university exam hall