अन्नत्याग नव्हे, आता देहत्याग!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

पाण्याचे स्रोत दूषित
टेकेपार येथील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कोलमडली आहे. पाण्याच्या शुद्धतेवर फरक पडला आहे. त्याची वास येत असून जलजन्य आजाराचे रुग्ण वाढले आहेत. डासांचे प्रमाण वाढले  आहे. बॅक वॉटरने अनेकांची पिके सडली असून ग्रामस्थांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

वेलतूर - टेकेपारवासींनी बुधवारपासून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला. आतापर्यंत सुरू असलेल्या जलसत्याग्रह व अन्नत्याग आंदोलनाला पुढे नेत देहत्याग आंदोलनाची तयारी चालविली आहे. आंदोलनात गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त समिती व भारिप बहुजन महासंघानेही पाठिंबा दर्शविल्याने आंदोलनाला अधिकच बळकटी मिळाली आहे. 

पालकमंत्री व जिल्हाधिकारी व पुनर्वसन अधिकारी यांच्या सर्व आंदोलकांच्या शिष्टमंडळाच्या नियमित बैठका सुरू आहेत. अधिकाऱ्यांच्या तोंडी सकारात्मक होकार मिळत असून लेखी पूर्तता होत नसल्याने ग्रामस्थ अडून आहेत. गोसेखुर्द धरणाचे बॅक वॉटर त्यांच्या गावाजवळ व शेतात जमा झाले असल्याने त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

पाण्याचे स्रोत दूषित
टेकेपार येथील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कोलमडली आहे. पाण्याच्या शुद्धतेवर फरक पडला आहे. त्याची वास येत असून जलजन्य आजाराचे रुग्ण वाढले आहेत. डासांचे प्रमाण वाढले  आहे. बॅक वॉटरने अनेकांची पिके सडली असून ग्रामस्थांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

वेळ देऊनही जिल्हाधिकारी भेटले नाहीत. पुनर्वसन अधिकारी त्यांच्या अधिकारातली बाब  नसल्याचे सागंतात. मग दाद कुणाला मागायची.
- अंकुश निरगुळकर, टेकेपार

सातत्याने त्यांच्या नोटिशीतील बोलावण्यावरून उमरेड, नागपूरला बैठकीसाठी गेलो, पण वेळेवर भेटणे सोडा अधिकारी व पदाधिकाऱ्यानी बोलणेही टाळले. 
- संदीप गोल्हर, टेकेपार

आंदोलकांची प्रकृती खालावली
आंदोलनाचा सातवा दिवस असल्याने अनेकांच्या तब्बेती आता बिघडत आहेत. अनेक आंदोलक सरकारच्या संवेदन शून्यतेचा धिक्‍कार करत असून आता औषधोपचारालाही ते नाकारत आहेत. अन्नत्याग व औषधोपचाराअभावी आंदोलकाचे पडलेले चेहरे आंदोलनाची अबोल तीव्रता बोलकी करत आहेत.

शेतीची कामे झाली प्रभावित
आंदोलनाने शेतीची कामेही प्रभावित झाली आहेत. हंगामही त्यांना अधिक बेचैन करत असून झाडाची हिरवी मिरची तोडणीअभावी झाडालाच सडत आहे. कापूस वेचणीअभावी झाडालाच  लगून आहे. भाजीपाला पीक काढणीअभावी वाफ्यातच सडत आहे. शाळा मात्र मागील सात दिवसांपासून विद्यार्थांअभावी ओस होती. गुरुजी तेवढे शाळा उघडून खुर्ची टाकून कार्यालयीन काम करत होते.

Web Title: No food now body donate

टॅग्स