Lockdown : पुणे, मुंबई, औरंगाबादमधून आलेले नागरिक या शहरातून करतात प्रवेश, म्हणून सोशल डिस्टींगचा होतो...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 May 2020

पुणे, मुंबई, औरंगाबाद सारख्या कोरोनाचा हॉट स्पॉट असलेल्या शहरातून आलेल्या प्रवाशांना लोणार -मेहकर तालुक्यात सुलतानपूर मधूनच प्रवेश करावा लागतो.

सुलतानपूर (जि.बुलडाणा) : पुणे, मुंबई, औरंगाबाद सारख्या कोरोनाचा हॉट स्पॉट असलेल्या शहरातून आलेल्या प्रवाशांना लोणार -मेहकर तालुक्यात सुलतानपूर मधूनच प्रवेश करावा लागतो. दर दिवशी सुलतानपूर मधून गेलेल्या औरंगाबाद - नागपूर  राज्यमहामार्गावरुण सकाळ संध्याकाळ शेकडो मजुर, कामगार घरी जाण्यासाठी पायी प्रवास करीत असतात.

अशातच सुलतानपूरात याचवेळी या -ना त्या कारणाने तर काही नागरिक विनाकारण शारीरिक अंतर ठेवण्याचे नियम मोडीत गप्पा करीत असतात. या गंभीर प्रकार कोरोनाला आमंत्रण ठरू नये या दृष्टीने स्थानिक नियत्रंण समितीने व शासनाने उपाय योजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.

हेही वाचा - पालकमंत्री बच्चू कडू यांनी जिल्हा सोडला वाऱ्यावर, जबाबदारीचे भानही विसरले

जीवनावश्यक वस्तूच्या विक्रीसाठी नियमांच्या आधीन राहून ठरावीक वेळेत मुभा दिली आहे. मात्र, अनेक ठिकाणी नागरिक सर्व नियम मोडीत काढीत तोंडाला मास्क न लावता सोशल डिस्टींगची ऐशी -तशी करताना दिसत आहे तर काही शहरातून आलेले नागरिक कोरंटाईन न होता शेतात किंवा इतर ठिकाणी लपून असल्याने त्यांची माहिती घेणे कठीण होत आहे. सध्या लॉक डाउनचा तिसरा टप्पा सुरू असून सध्याच्या परिस्थिती कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्याचा हा महत्त्वाचा टप्पा आहे. 

आवश्यक वाचा - चिंताजनक! या जिल्ह्याच्या कोरोनामुक्तीच्या आनंदावर काही तासातच विरजन

या कालावधीत नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक असताना सुलतानपुरात काही व्यावसायिक व नागरिक नियमांना बगल देवून कोरोनाला आमंत्रण देण्यासाठी कारणीभूत ठरण्यासारखे वागत आहे. आतापर्यंत शासनाच्या कडक अमंलबजावणीने लोणार- मेहकर तालुक्यात कोरोनाला शिरकाव करण्यापासून रोखले असून हीच परिस्थिती कायम ठेवण्यासाठी शासनाच्या नियमांची तंतोतंत अमंलबजावणी करण्याची गरज व्यक्त होत आहे.

लोकप्रतिनिधींनी पुढे येण्याची गरज
कोरोनाच्या महाभयंकर आजाराशी लढा देण्यासाठी आरोग्य यंत्रणा, पोलिस यंत्रणा यांच्याबरोबरच स्थानिक पदाधिकार्‍याची सुद्धा फार मोठी जबाबदारी असते. त्यादृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. शासनाने शहरी भागात कामानिमित्त गेलेल्या नागरिकांसाठी घरवापसीची परवानगी दिल्याने अनेक व्यक्ती गावी परतत आहेत. त्यामुळे शहरी भागातून आलेल्या नागरिकांना सुलतानपूर मधूनच जावे लागते. त्यामुळे सुलतानपूर वासीयांनी विशेष काळजी घेण्याची गरज व्यक्त होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no social distancing in buldana district village