साडेपाच हजार शाळांत नाही शौचालय 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 मे 2018

अकोला - स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली असली, तरी राज्यातील एक लाख दहा हजार 315 शाळांपैकी तीन हजार 348 शाळांमध्ये मुलांची, तर 2018 शाळांमध्ये मुलींची शौचालयेच नाहीत. असलेल्या शौचालयांपैकी तब्बल सात हजार 60 शाळांमधील शौचालये वापराविना पडून आहेत. तीन हजार 653 शाळांमध्ये मुतारी नसल्याचे धक्कादायक वास्तव "यू-डायस'च्या 2017-18 च्या आकडेवारीवरून समोर आले आहे. 

पहिलीपासून सुरू होणाऱ्या राज्यातील शाळांमधूनच मुला, मुलींच्या बौद्धिक, शारीरिक व मानसिक विकासाची पायाभरणी केली जाते, असे म्हटले जात असले, तरी राज्यातील जिल्हा परिषदेच्या तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांकडे असलेल्या अनेक शाळांमध्ये आरटीईप्रमाणे भौतिक सुविधांचा लाभ मिळत नसल्याचे या अहवालातून उघडकीस आले आहे. शौचालयाबरोबर वर्गखोल्या, शाळा इमारत, मुख्याध्यापकासाठी स्वतंत्र कक्ष, पिण्याचे पाणी, पाकगृह, संरक्षक भिंत, क्रीडांगण, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी रॅम्प, स्वतंत्र शौचालय अशा अनेक सुविधा नसल्याचेही "यू-डायस'ची आकडेवारी सांगते. 

1,10,315  - शाळांची संख्या 

3348  - मुलांची शौचालये नसलेल्या शाळा 

2018 -  मुलींची शौचालये नसलेल्या शाळा 

28,680 -  दिव्यांग मुलांसाठी स्वतंत्र शौचालय नसलेल्या शाळा 

(हे सर्वाधिक प्रमाण बीड आणि नांदेड जिल्ह्यांतील शाळांत आहे, तर वापरात नसलेल्या सात हजार शाळांमध्ये नगर, जालना, पुणे, नागपूर या जिल्ह्यांतील शाळांचे प्रमाण सर्वाधिक आहे.) 

18,123  - शाळांना संरक्षण भिंत नाही. 

1854  - बीड जिल्ह्यातील शाळा 

1802  - नाशिकमधील शाळा 

Web Title: No toilets in five and a half thousand schools in akola