अजून किती हंगाम जाणार कोरडे

farm.jpg
farm.jpg

तळेगाव ठाकूर (जि. अमरावती) : रब्बी हंगामासाठी लागणारे पाणीच केकतपूर शिवारातील शेतकऱ्यांना न मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी तळेगाव ठाकूर येथे उपस्थित झालेल्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत या समस्येचा जाब विचारला.

प्राप्त माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यात मोझरीपासून काही अंतरावर केकतपूर तलाव आहे. या तलावाला मुबलक पाणी आहे आणि या पाण्याच्या भरवश्‍यावर मोझरी, गुरुदेवनगर, तळेगाव ठाकूर आदी गावातील शेतकरी रब्बी हंगामाचे पीक घेतात. मात्र यंदाच्या रब्बी हंगामासाठी अद्यापही पाणी शेतकऱ्यांना मिळाले नाही. याबाबत त्या भागातील अनेक शेतकऱ्यांनी संबंधित प्रशासनाचे,जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजविले, निवेदने दिली मात्र तरीही शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम कोरडाच राहिला.

तालुक्‍यातील केकतपूर तलावाच्या खाली 395 हेक्‍टर जमिनीत असून यामध्ये कोरडवाहू हरभरा या पिकाची लागवण या भागातील शेतकऱ्यांनी केली रब्बी हंगामातील गहू पिकाची लागवड करायची असल्यामुळे या भागातील कालव्याला पाणी नसल्यामुळे गहू या पिकांची लागवड होणे शक्‍य नाही. दिनांक 15 नोव्हेंबर2019 पासून शेतकऱ्याच्या जमिनीसाठी पाणी सोडायला पाहिजे होतं मात्र अजून पर्यंत केकतपूरच्या तलावांमधील पाणी सोडण्यात आले नसल्याने या भागातील शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना तीन तास धारेवर धरले होते, या भागातील शेतकऱ्यांनी पाणी सोडण्यास संदर्भात अनेक निवेदने देऊन सुद्धा रब्बी हंगाम पिकासाठी पाणी वेळेवर सोडले नसून पिकाचे नुकसान होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. अखेर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना समस्या न सुटल्यास उपोषण करण्याचा इशारा दिल्यानंतर आज पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता हरीश देशमुख व अन्य अधिकारी उपस्थित झाले होते.त्यांच्यासमोर संतप्त शेतकऱ्यांनी दुपारी चक्क तीन तास समस्येवर चर्चा करीत त्यावर उपाययोजना करण्याचा एकच प्रश्न उपस्थित केला.
अखेर संतप्त शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन या तलावातुन पाणी सोडण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिल्यानंतर शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.मात्र दोन ते पाच वाजेपर्यंत शेतकरी त्यांच्या समस्येला घेऊन ठाम पणे आपली भूमिका मांडीत अधिकाऱ्यांसमोर बसले होते.यावेळी या भागातील प्रवीण मते, श्रीकृष्ण बांते,प्रज्वल बोबडे, कल्याण पाटील, उमेश भुयार, योगेश गोडसे, स्वप्नील मोहोळ, अरविंद पाटील यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.

अधिकाऱ्यांना कोंबून ठेवण्याचा प्रयत्न फसला.
शेकडो शेतकरी तळेगाव ठाकूर ग्रामपंचायत सभागृहात हजर झाले यावेळी पटबांधरे विभागाचे उप अभियंता व कर्मचारी शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी गेले असता तीन तास शेतकऱ्यांसोबत बोलून अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसोबत मनधरणी करण्याचा प्रयत्न केला मात्र संतप्त शेतकऱ्यांनी या अधिकाऱ्यांना सभागृहाला कुलूप ठोकून कोंढाण्याचा प्रयत्न केला मात्र तो प्रयत्न शेतकऱ्यांनी मागे घेत तीन तास अधिकाऱ्यांना बसून ठेवले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com