उत्तर, दक्षिण, पूर्वेतील पाणीपुरवठा उद्या बंद

उत्तर, दक्षिण, पूर्वेतील पाणीपुरवठा उद्या बंद

नागपूर - गोधनी येथील पेंच-४ जलशुद्धीकरण केंद्राला पाण्याचा पुरवठा होणाऱ्या जलवाहिनीला गळती आढळून आली. गळती रोखण्यासाठी दुरुस्तीची कामे २९ मार्च रोजी सकाळी ११ पासून सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे बारा तासांपर्यंत जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने उत्तर, दक्षिण, पूर्व नागपुरातील वस्त्यांना पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

गळती दुरुस्तीच्या कामामुळे नारा जलकुंभ, सुगतनगर जलकुंभ, सिव्हिल लाइन्स डायरेक्‍ट टॅपिंग, श्रीनगर  डायरेक्‍ट टॅपिंग, ओंकारनगर जलकुंभ, धंतोली जलकुंभ, म्हाळगीनगर जलकुंभ, बेझनबाग जलकुंभ, इंदोरा जलकुंभ, बोरियापुरा फीडर मेनअंतर्गत वस्त्यांना पाणीपुरवठा होणार नाही. यात नारा जलकुंभाअंर्तगत येणाऱ्या निर्मल सोसायटी, आराधना कॉलनी, शंभुनगर, शिवगिरी ले-आउट, नूरी कॉलनी, तावक्कल सोसायटी, आर्यनगर, ओमनगर, नारागाव, वेलकम सोसायटी, देवीनगर, प्रीती सोसायटी, नारी, जरीपटका, भीम चौक, हुडको कॉलनी, नागार्जुन कॉलनी, कस्तुरबानगर, कुकरेजानगर, मार्टिननगर, विश्‍वासनगर, खुशीनगर, एलआयजी कॉलनी, एमआयजी कॉलनी, सुगतनगर, कबीरनगर, कपिलनगर, कामगारनगर, रमाईनगर दीक्षितनगर, सन्यालनगर, चैतन्यनगर, सहयोगनगर, मानवनगर, शेंडेनगर, राजगृहनगर, लहानूजीनगर, इंदोरा जलकुंभाअंतर्गत येणाऱ्या मायानगर, चॉक्‍स कॉलनी, लघुवेतन कॉलनी, सिव्हिल लाइन्स डायरेक्‍ट टॅपिंगअंतर्गत येणाऱ्या सिव्हिल लाइन्स, मरियमनगर, रवींद्रनाथ टागोर रोड, व्हीसीए रोड, पाम रोड, शासकीय मुद्रणालय, धंतोली जलकुंभाअंतर्गत धंतोली, काँग्रेसनगर, डम्पयार्ड रोड, तकिया झोपडपट्टी, ओंकारनगर जलकुंभ क्रमांक १ व २ अंतर्गत येणाऱ्या रामटेकेनगर, रहाटेनगर टोली, अभयनगर, गजानननगर, जोगीनगर, पार्वतीनगर, भीमनगर, जय भीमनगर, जयवंतनगर, शताब्दीनगर, कुंजीलालपेठ, हावरापेठ, बालाजीनगर, चंद्रनगर, नालंदानगर, रामेश्‍वरी, बॅनर्जी ले-आउट, म्हाळगीनगर जलकुंभाअंतर्गत येणाऱ्या आशीर्वादनगर, रुक्‍मिणीनगर, गुरुदेवनगर, श्रीरामनगर, संजय गांधीनगर, सरताज कॉलनी, महात्मा गांधीनगर, म्हाळगीनगर, गजानननगर, न्यू प्रेरणानगर, श्रीनगर डायरेक्‍ट टॅपिंगअंतर्गत येणाऱ्या श्रीनगर, सुंदरबन, सुयोगनगर, साकेतनगर, अरविंद सोसायटी, बोरकुटे ले-आउट, पीएमजी सोसायटी, विजयानंद सोसायटी, संताजी सोसायटी, डोबीनगर, म्हाडा कॉलनी, बेझनबाग जलकुंभाअंतर्गत दयाल सोसायटी, दयानंदनगर, सिंधू सोसायटी, गुरुनानकनगर, बाबा हरदासम आश्रम रोड, बॅंक कॉलनी, वासनशाह चौक, संगीत बिल्डींग, मेन बाजार रोड, हेमू कॉलनी, कमलफूल चौक, जुना जरीपटका, महावीर गर, नानकानी लाइन, महात्मा फुलेनगर, फ्रेंड्‌स कॉलनी, एम्प्रेस मिल चौक, बेझनबाग ले-आउट, वरपाखड, मुकुंद सोसायटी, जनता हॉस्पिटल भाग, लुंबिनीनगर, सिंधू सोसायटी, कुंगर कॉलनी, खदान ले-आउट या वस्त्यांत पाणीपुरवठा होणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com