सर्वच धार्मिक वास्तू अनधिकृत नाहीत - नितीन गडकरी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

नागपूर - वाहतुकीला अडथळा होत नसलेले तसेच सरसकट सर्वच धार्मिक स्थळे अनधिकृत असल्याचे दाखवून पाडण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये असंतोष उफाळून आला आहे. यामुळे काही विपरीत घडल्यास महापालिका, नागपूर सुधार प्रन्यास जबाबदार राहील, असा इशारा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिला.  

नागपूर - वाहतुकीला अडथळा होत नसलेले तसेच सरसकट सर्वच धार्मिक स्थळे अनधिकृत असल्याचे दाखवून पाडण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये असंतोष उफाळून आला आहे. यामुळे काही विपरीत घडल्यास महापालिका, नागपूर सुधार प्रन्यास जबाबदार राहील, असा इशारा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिला.  

धार्मिक स्थळांच्या अनधिकृत वास्तू तोडण्याची क्षेत्रीय पातळीवर कार्यवाही करण्यासाठी राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय व महानगर पालिकास्तरीय समित्या नियुक्‍त करण्यात आलेल्या आहेत. या समित्यांमार्फत अनधिकृत धार्मिक स्थळांमुळे कायदा व सुव्यवस्था निर्माण होतो किंवा धार्मिक स्थळे रस्त्याच्यामध्ये किंवा वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या जागेत असतील तरच त्या काढणे अपेक्षित आहेत. मात्र, महानगरपालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासद्वारा शहराच्या लोकवस्तीत असलेल्या धार्मिक स्थळांना अनधिकृत धार्मिक स्थळे दर्शवून पाडण्यात येत आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. 

यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला तर त्याला जिल्हाधिकारी, नागपूर, आयुक्‍त, महानगरपालिका, सभापती, नागपूर सुधार प्रन्यास, पोलिस विभाग जबाबदार राहतील असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

वस्त्यांमधील वाहतुकीला अडथळा निर्माण न होणाऱ्या धार्मिक वास्तू पाडण्यात येऊ नये तसेच त्यांचे नियमितीकरण व स्थलांतर याबाबत आवश्‍यक ती कारवाई करावी, असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले आहे.

शक्‍य असल्यास स्थलांतर करा
अनधिकृत धार्मिक स्थळांसंदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शासनातर्फे धडक कारवाई केली जात आहे. मात्र, कारवाई करताना आदेश योग्य पद्धतीने पाळल्या जात नाही. ज्या वास्तू वाहतुकीला अडथळा निर्माण करणार नाहीत व नियमाप्रमाणे स्थलांतर करणे शक्‍य होतील अशा वास्तू स्थलांतरित करण्याचे आवाहन गडकरी यांनी केले.

Web Title: Not all religious places are unauthorized