Loksabha 2019 : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या 30 व्यक्‍तींना नोटीस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 एप्रिल 2019

सोशल मीडियावर येणाऱ्या पोस्टवर सोशल मीडिया सेलची नजर असून, आतापर्यंत 30 पेक्षा जास्त व्यक्तींची आक्षेपार्ह पोस्ट असल्याचे आढळले आहे. यातील काही व्यक्तींना नोटीस बजावली आहे. एकावर लकडगंज पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल केला आहे. 

नागपूर - सोशल मीडियावर येणाऱ्या पोस्टवर सोशल मीडिया सेलची नजर असून, आतापर्यंत 30 पेक्षा जास्त व्यक्तींची आक्षेपार्ह पोस्ट असल्याचे आढळले आहे. यातील काही व्यक्तींना नोटीस बजावली आहे. एकावर लकडगंज पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल केला आहे. 

अलीकडच्या काळात सोशल मीडियाचा प्रचार, प्रसिद्धीसाठी मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. मागील लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियाचा सत्तेत येण्यासाठी भाजपला मोठा फायदा झाल्याचे सांगण्यात येते. सोशल मीडियावरून दुष्प्रचार आणि खोटी माहितीही पसरविण्यात येते. तसेच सामाजिक तेढ निर्माण करणारे पोस्टही टाकण्यात येते. त्यामुळे सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक विभागाकडून स्वतंत्र समिती गठित करण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्याचप्रमाणे उमेदवारांच्या सोशल अकाउंटची माहिती देणे बंधनकारक केले. उमेदवारांच्या सोशल अकाउंटवरील पोस्टवरही लक्ष असून, त्याचा खर्च उमेदवारांच्या खर्चात जोडण्यात येत आहे. 

Web Title: Notice to 30 people posting objectionable posts on social media