Vidhan Sabha 2019 : पाच उमेदवारांना नोटीस

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

नागपूर : खर्चाची माहिती सादर न केल्याने पाच उमेदवारांना नोटीस बजावण्यात आली आहे. यात दक्षिण-पश्‍चिम नागपूर विधानसभा मतदार संघातील एक तर हिंगणा मतदार संघातील चार उमेदवारांचा समावेश आहे. निवडणुकीत खर्चाची मर्यादा घालून दिली आहे. यामुळे उमेदवारांना खर्चाची माहिती सादर करणे आवश्‍यक आहे. खर्चासाठी त्यांना स्वतंत्र बॅंक खातेही तयार करायचे असून, त्यातूनच खर्च करायचा आहे. प्रत्येक उमेदवारांना केल्याची खर्चाची माहिती तीन टप्प्यात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करायची आहे.

नागपूर : खर्चाची माहिती सादर न केल्याने पाच उमेदवारांना नोटीस बजावण्यात आली आहे. यात दक्षिण-पश्‍चिम नागपूर विधानसभा मतदार संघातील एक तर हिंगणा मतदार संघातील चार उमेदवारांचा समावेश आहे. निवडणुकीत खर्चाची मर्यादा घालून दिली आहे. यामुळे उमेदवारांना खर्चाची माहिती सादर करणे आवश्‍यक आहे. खर्चासाठी त्यांना स्वतंत्र बॅंक खातेही तयार करायचे असून, त्यातूनच खर्च करायचा आहे. प्रत्येक उमेदवारांना केल्याची खर्चाची माहिती तीन टप्प्यात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करायची आहे. शुक्रवारी उमेदवारांना खर्चाची माहिती सादर करण्यास सांगितले होते.दक्षिण-पश्‍चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या पहिल्या निवडणूक खर्चाची लेखा तपासणी बचत भवन सभागृहात झाली. येथील 20 पैकी एक उमेदवार अनुपस्थित राहिला. हिंगणा विधानसभा मतदारसंघातील 12 पैकी चार उमेदवार अनुपस्थित राहिले. खर्च निरीक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या निवडणूक खर्च लेखे सादर करण्यास उमेदवार किंवा प्रतिनिधी अनुपस्थित राहिल्यामुळे आयोगाने पाचही उमेदवारांना नोटीस बजावली. मंगळवारी खर्चाची तपासणी करण्यात येणार आहे. उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चाची माहिती व निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी काढलेल्या खर्चाच्या माहितीत अंतर आल्यास त्यांनाही नोटीस बजावून स्पष्टीकरण मागविण्यात येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Notice to five candidates