नवोदय बॅंकप्रकरणी राज्य शासनाला नोटीस

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

नागपूर : नवोदय अर्बन को ऑपरेटिव्ह बॅंकेतील आर्थिक घोटाळाप्रकरणी राज्य सरकारच्या गृह विभाग, तपास अधिकाऱ्यांना नोटीस बजावली असून दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. तसेच, बॅंकेचे वित्तीय सल्लागार दक्षिणदास यांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. नवोदय अर्बन को ऑपरेटिव्ह बॅंकेतील आर्थिक घोटाळा प्रकरणात माजी आमदार अशोक धवड, त्यांच्या पत्नी किरण धवड आणि वित्तीय सल्लागार दक्षिणदास यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याचिकाकर्त्यांच्या म्हणन्यानुसार, बॅंकेतील काही कर्जाच्या एकमुस्त सेटलमेंटमध्ये शासकीय अध्यादेशाचे पालन करण्यात आले नाही, असा दावा करण्यात आला आहे. मात्र, राज्य सरकारच्या अध्यादेशानुसार कोणत्याही कर्जाच्या सेटलमेंटचा विचार करण्यासाठी बॅंकेच्या समितीकडे प्रस्ताव सादर करणे आवश्‍यक आहे. त्या प्रस्तावावर निर्णय झाल्यानंतर संचालक मंडळ त्यावर निर्णय घेतात. त्यामुळे, त्या निर्णय प्रक्रियेत वित्तीय सल्लागाराचा कोणताही समावेश नाही. तसेच, बॅंकेशी 2015 साला नंतरच संबंध आला, तर कर्ज प्रकरणे त्यापूर्वीची आहेत.
दक्षिणदास हे केवळ बॅंकेचे वित्तीय सल्लागार आहेत. त्यांचा या कथित गैरप्रकाराशी कोणताही संबंध नाही. बॅंकेच्या दैनंदिन कामकाजात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग नव्हता. तरीही बॅंकेतील 38 कोटी 75 लाख 20 हजार 641 रुपयांचा गैरव्यवहार झाल्याच्या श्रीकांत सुपे यांच्या तक्रारीवरून एफआयआर नोंदवला आहे. याप्रकरणी दक्षिणदास यांना अटक करण्यात आली असून त्यांनी जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, सत्र न्यायालयाने त्यांना जामीन नाकारला. सत्र न्यायालयाच्या त्या निर्णयाला आता उच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आले आहे. त्यावर, 5 सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. याचिकाकर्त्यांतर्फे वरिष्ठ अधिवक्ता ऍड. सुनील मनोहर व ऍड. उदय डबले यांनी बाजू मांडली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Notice to State Government for Navodaya Bank