दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : मुख्य वनसंरक्षकांना राज्य महिला आयोगाकडून नोटीस

notice from the State Womens commission to the Chief Forest Officer in deepali chavan suicide case amravati
notice from the State Womens commission to the Chief Forest Officer in deepali chavan suicide case amravati

अमरावती : दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी राज्य महिला आयोगाने स्वाधिकारे दखल घेत मेळघाट व्याघ्रप्रकल्पाच्या मुख्य वनसंरक्षकांना नोटीस जारी करण्यात आली. याबाबत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी माहिती दिली.

दीपाली चव्हाण यांच्या सुसाईड नोटमध्ये वनसंरक्षकाचे नाव असल्याचा उल्लेख असलेली बातमी माध्यमातून प्रसिद्ध झाली आहे. त्याचप्रमाणे आयोगाला प्राप्त झालेले विविध ई-मेल लक्षात घेता आयोगाने याप्रकरणी दखल घेत अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक श्रीनिवास रेड्डी यांना नोटीस जारी केली आहे.

कामाच्या ठिकाणी महिलेला मानसिक त्रास होऊन आत्महत्या होणे ही अत्यंत दुर्देवी घटना असून, आयोगाने याची स्वाधिकारे दखल घेतली आहे. याप्रकरणी वनसंरक्षकाचा उल्लेख होत असल्याने आपला लेखी खुलासा आयोगाच्या कार्यालयात आठ दिवसांच्या आत प्रत्यक्ष किंवा आपल्या वकिलामार्फत सादर करण्याचे नोटीशीत नमूद आहे. आयोगाच्या सदस्य सचिव अनिता पाटील यांनी ही नोटीस जारी केली आहे. याप्रकरणाची संपूर्ण सखोल चौकशी करण्यात येईल. दोषींची गय केली जाणार नाही. कुठेही अपप्रकार घडत असेल तर महिलांनीही निर्भिडपणे पुढे येऊन महिला आयोगाकडे तक्रार करावी. मी रोज सर्व तक्रारींचा आढावा घेणार आहे, असे महिला व बालविकास मंत्री श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com