सराफा व्यावसायिकाचा छंदच न्यारा; स्वकलेतून लढविली अशी शक्कल

संतोष चक्रनारायण
Tuesday, 21 April 2020

कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून राज्यासह जिल्ह्यात लॉकडाउन आहे. त्यामुळे व्यवसाय, आणि दैनंदिन कामे ठप्प झाले पण सराफा व्यवसायात आपली वेगळी छाप पाडणारे पन्नास वर्षीय सुनील गिऱ्हे यांनी मात्र, लॉकडाउनच्या कालावधीत शाडूच्या माती पासून भगवान श्रीकृष्णांची मूर्ती घरात स्वकलेतून बनवली. त्यामुळे त्यांच्यातील मूर्ती बनविण्याचा छंद पुन्हा आजही कायम बघायला मिळत असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

बोरगाव मंजू (जि.अकोला) : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून राज्यासह जिल्ह्यात लॉकडाउन आहे. त्यामुळे व्यवसाय, आणि दैनंदिन कामे ठप्प झाले पण सराफा व्यवसायात आपली वेगळी छाप पाडणारे पन्नास वर्षीय सुनील गिऱ्हे यांनी मात्र, लॉकडाउनच्या कालावधीत शाडूच्या माती पासून भगवान श्रीकृष्णांची मूर्ती घरात स्वकलेतून बनवली. त्यामुळे त्यांच्यातील मूर्ती बनविण्याचा छंद पुन्हा आजही कायम बघायला मिळत असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

हेही वाचा- वडिलांचा होता अत्यंसंस्कार मात्र, लॉकडाउनमुळे जाणे शक्य नव्हते म्हणून त्याने...

लहानपनापासूनच आहे छंद
सुनील पुंडलिक गिऱ्हे हे बोरगाव मंजुतील सराफा व्यवसायिक अनिल गिऱ्हे यांचे मोठे बंधू असून, ते वास्तव्यास अकोला येथील गोकुळ कॉलनी येथे आहेत. त्यांचा मूळ व्यवसाय हा सोन्या-चांदीच्या वस्तूंची खरेदी, विक्री करणे असून, ते सराफा व्यसायिक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्याचे स्वतःचे दुकान बाळापूर तालुक्यातील पारस येथे आहे. लहानपनापासून सुनील यांना मूर्ती कला जोपासण्याचा छंद आहे. कधीही विक्री करण्याच्या बेताने मूर्ती कला आत्मसात केली नाही. त्यांनी आतापर्यंत अनेक मूर्ती या शाडूच्या मातीपासून कुठल्याही रेडिमेड साच्याचा वापर न करता हाताच्या कलेतून तयार करून कुटुंबातील व्यक्तींसह मित्रांना सुंदर अशा मूर्ती विविध कार्यक्रमात भेटवस्तू म्हणून दिल्यात.

क्लिक करा- अमर रहे अमर रहे...साश्रुनयनांनी वीरपुत्रास दिला निरोप

दोन भाऊ करतात सहकार्य
सध्या कोरोना आजाराचा संसर्ग वाढत असल्याने लॉकडाउन आहे. त्यामुळे ‘घरात रहा सुरक्षित रहा’ या संदेशाचे पालन करून सुनील गिऱ्हे यांनी स्वतःमधील मूर्ती कला पुढे आणून शाडूच्या मातीपासून भगवान श्रीकृष्णांची एक फूट उंचीची मूर्ती तयार करण्यास सुरुवात केली. नाक, डोळे, कान, हात-पाय-बोटे ही मानवजात शोभेल असे वर्णन साकारून एक आठवड्यात ही मूर्ती पूर्ण केली. संकटांपासून दूर ठेवणाऱ्या या दैवताची आराधना करणे, पूजा अर्चा करून त्याच्या विषयी भक्ती भाव ठेवून आपले दैनंदिन काम ते करत असतात. तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून विविध मूर्तीतून सुंदर अशा प्रतिकृती बनविण्याचा त्यांचा हा छंद आहे. हा छंद जोपासताना धाकटा भाऊ अनिल गिऱ्हे, लहान भाऊ मनोहर गिऱ्हे यांचे सहकार्य मिळत रहाते. या मूर्ती कलेत पुढे सुबक श्रीकृष्णची मूर्ती साकारल्यानंतर विविध रंगांचा वापर करून मूर्तींचे रंगकाम पूर्ण केले. त्यामुळे शाडूमातीची ही श्रीकृष्णाची मूर्ती मित्रपरिवारातही चर्चेचा विषय ठरल्या जात आहेत.

पुन्हा संधी मिळाली
मूर्तीकला लहानपणापासून आत्मसात केली. वेळ मिळेल तेव्हा शाडू मातीचा वापर करून मूर्ती बनवत होतो. मात्र आता कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने ही मूर्ती कला पुन्हा साकार करण्याची संधी मिळाली. आपला छंद ही पूर्ण होत आहे.
-सुनील गिऱ्हे, मूर्ती कलाकार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The notion of a bullion business is different; By yourself The shawls that fought