कुख्यात गुंड पवन मोरयानीला अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

नागपूर ः तडीपार असतानाही शहरात प्रवेश करून शस्त्राच्या धाकावर हैदोस घालणारा सराईत गुन्हेगार पवन परमानंद मोरयानी (वय 31) याच्या पाचपावली पोलिसांनी मुसक्‍या आवळल्या आहेत. जवळपास एक महिन्यापूर्वीही पवनने तहसील ठाण्यांतर्गत प्रॉपर्टीच्या वादात एकाला जिवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणात त्याच्याविरुद्ध गुन्हाही नोंदविण्यात आला होता. तेव्हापासून पोलिस त्याच्या मागावर होते. बुधवारी पहाटे पोलिसांना माहिती मिळाली की, तो लष्करीबागच्या नवा नकाशा परिसरात शस्त्राच्या धाकावर हैदोस घालत आहे. तत्काळ पोलिसांचे एक पथक तेथे पोहोचले आणि त्याला अटक केली.

नागपूर ः तडीपार असतानाही शहरात प्रवेश करून शस्त्राच्या धाकावर हैदोस घालणारा सराईत गुन्हेगार पवन परमानंद मोरयानी (वय 31) याच्या पाचपावली पोलिसांनी मुसक्‍या आवळल्या आहेत. जवळपास एक महिन्यापूर्वीही पवनने तहसील ठाण्यांतर्गत प्रॉपर्टीच्या वादात एकाला जिवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणात त्याच्याविरुद्ध गुन्हाही नोंदविण्यात आला होता. तेव्हापासून पोलिस त्याच्या मागावर होते. बुधवारी पहाटे पोलिसांना माहिती मिळाली की, तो लष्करीबागच्या नवा नकाशा परिसरात शस्त्राच्या धाकावर हैदोस घालत आहे. तत्काळ पोलिसांचे एक पथक तेथे पोहोचले आणि त्याला अटक केली. सांगण्यात येते की, त्यावेळी इरफान नावाचा चर्चित गुंडही त्याच्या सोबत होता. पवनविरुद्ध मारहाण, जिवे मारण्याची धमकी, कोटपा ऍक्‍ट, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे आणि विनयभंगासह 10 गुन्हे नोंद आहेत. तो नौशाद-इप्पा टोळीचा सक्रिय सदस्य आहे. त्याची गुन्हेगारी प्रवृत्ती पाहता झोन 3 चे पोलिस उपायुक्त राहुल माकणीकर यांनी 20 मे रोजी त्याला नागपूर जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी तडीपार केले होते. यानंतरही तो शहरात सक्रिय होता. मागच्या महिन्यात त्याने एका व्यक्तीला जमिनीच्या वादात जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्याच्या विरोधात तहसील ठाण्यात गुन्हाही नोंदविण्यात आला. मात्र पवन पोलिसांना सापडत नव्हता. अखेर बुधवारी पहाटे तो पोलिसांना गवसला. ही कारवाई डीसीपी माकणीकर यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक मेश्राम, सपोनि पवन मोरे, हवालदार चिंतामन डाखोळे, नापोशि रविशंकर मिश्रा, विजय जाने, सुनील वानखेडे आणि दिनेश शुक्‍ला यांनी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The notorious gangster Pawan Morayani arrested