ऐका हो ऐका! कोरोना टेस्ट आता बंधनकारक, व्यापारी संघटनांना देणार पत्र

corona
corona

अमरावती : कोरोना संकट दिवसेंदिवस गहन होते आहे. त्यामुळे प्रशासन नवनवीन उपाययोजना करते आहे. आता बाजारपेठ मुक्त करण्यात आल्या असल्याने कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढते आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सर्व व्यावसायिक व त्यांच्या आस्थापनेतील कर्मचाऱ्यांना कोरोना टेस्ट बंधनकारक करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी सांगितले. व्यापारी संघटनांना याची माहिती देण्यात येणार आहे.

शहरातील बाजारपेठेतील काही व्यावसायिक व त्यांचे कर्मचारी यापूर्वी लॉकडाउन व अनलॉकमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांच्या घरातील सदस्यांनाही त्यामुळे बाधा झाल्याने बाधित रुग्णसंख्येत भर पडली आहे. आता बाजारपेठ पूर्णतः मुक्त झाली आहे. पी-१ व पी-२ श्रेणीनुसार उघडण्यात येणारी बाजारपेठ आठवड्यातून पाच दिवस सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत खुली करण्यात आली आहे.

बाजारात ग्राहकांचीही संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याने गर्दी झाली आहे. या गर्दीत सोशल डिस्टंन्ससह कोरोना नियमांचे उल्लंघनही होऊ लागले आहे. महानगरातील कोरोनाबाधितांची संख्या दररोज शतक पार करू लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर बाजारपेठेतील सर्व प्रकारच्या व्यावसायिक व त्यांच्या आस्थापनेतील कर्मचाऱ्यांना कोरोना टेस्ट बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सविस्तर वाचा - कस्टमर केअरच्या नावाने असलेले नंबर नक्की कोणाचे? युवकाच्या खात्यातून ९५ हजार लंपास सावधान

यापूर्वी व्यावसायिकांना टेस्ट केल्यानंतरच आस्थापना सुरू करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी केले होते. त्यास मात्र प्रतिसाद मिळाला नाही. व्यावसायिकांनी व्यवसायावर लक्ष केंद्रित करून कोरोना टेस्ट करण्याकडे दुर्लक्ष केले. त्याचाच परिणाम आजही व्यापारपेठेतून कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. सर्व व्यावसायिकांनी कोरोना टेस्ट करून घ्यावी, असे पत्र व्यापारी संघटनांना पाठविण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी सांगितले.

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com