esakal | काय म्हणता? कोरोना झाला तरी आता गृह विलगीकरण!
sakal

बोलून बातमी शोधा

corona mask

भारत सरकारच्या १० मे २०२० रोजीच्या आदेशानुसार कोविड-१९ संशयित पॉझिटीव्ह असलेल्या रुग्णासाठीच्या योग्य व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक सुचना यापूर्वी निर्गमित झाल्या आहेत. त्यानुसार राज्य शासनाने सर्व संशयित (ज्यांचे प्रयोगशाळा तपासणी अहवाल प्रतीक्षेत आहेत), व पॉझिटीव्ह रुग्णांना रुग्णालयामध्ये विलगीकरणासह योग्य व्यवथापनाव्दारे आजाराचे संक्रमण खंडीत करण्याविषयी सुचित केले आहे.

काय म्हणता? कोरोना झाला तरी आता गृह विलगीकरण!

sakal_logo
By
रूपेश खैरी

वर्धा : कोरोनाबाधित रुग्णांना लक्षणानुसार आणि योग्य उपचारासाठी रुग्णालयामध्ये ठेवण्याचे शासनाचे निर्देश आहेत. तथापि, केंद्र व राज्य शासनाच्या नवीन मार्गदर्शक सूचनेनुसार सौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोविड पॉझटीव्ह रुग्णांना त्यांच्या संमतीनुसार आणि घरातील योग्य सुविधेनुसार घरी विलगीकरणाचा पर्याय (Home Isolation) उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी काढल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.

भारत सरकारच्या १० मे २०२० रोजीच्या आदेशानुसार कोविड-१९ संशयित पॉझिटीव्ह असलेल्या रुग्णासाठीच्या योग्य व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक सुचना यापूर्वी निर्गमित झाल्या आहेत. त्यानुसार राज्य शासनाने सर्व संशयित (ज्यांचे प्रयोगशाळा तपासणी अहवाल प्रतीक्षेत आहेत), व पॉझिटीव्ह रुग्णांना रुग्णालयामध्ये विलगीकरणासह योग्य व्यवथापनाव्दारे आजाराचे संक्रमण खंडीत करण्याविषयी सुचित केले आहे.

प्रचलित मार्गदर्शक सुचनेनुसार, रुग्णांना वैद्यकीयदृष्टया आढळून आलेल्या लक्षणानुसार लक्षणे नसलेले, सौम्य वा अतिसौम्य लक्षणे, मध्यम तीव्र लक्षणे व तीव्र लक्षणांमध्ये वर्गीकृत करण्यात येते. त्यानुसार रुग्णांना अनुक्रमे कोविड केअर सेंटर (CCC) व डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर (DCHC) व डेडिटेड कोविड हॉस्पिटल (DCH) येथे दाखल करण्यात येते. तथापि, ७ जुलैच्या राज्य व केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोविड पॉझिटीव्ह रुग्णांना त्यांचे घरामध्ये योग्य प्रकारे सुविधा असल्यास त्यांचे संमतीनुसार घरी विलगीकरणाचा पर्याय (Home Isolation) उपलब्ध करुन देण्यात येईल असे डवले यांनी सांगितले.

गृहविलगीकरणासाठी (Home isolation)पात्रता
वैद्यकीय अधिक्षक, उपजिल्हा रुग्णालय/ग्रामीण रुग्णालय यांनी कोविड-१९ रुग्णांची सखोल तपासणी करुन रुग्णास लक्षणे नसल्याबाबत किंवा अतिसौम्य लक्षणे असल्याबाबत प्रमाणीत केलेले असावे. तसे आदेश निर्गमित केल्यानंतर आरोग्य पथकाने संबंधित रुग्णाच्या घरी त्यांच्या विलगीकरणासाठी तसेच कुटुंबातील व्यक्तींच्या विलगीकरणासाठी (Home Qurantine) योग्य सोयी-सुविधा उपलब्धतेची तपासणी करतील.

रोगप्रतिकारक क्षमता कमी असलेले रुग्ण (एचआयव्हीग्रस्त, कर्करोगाचा उपचार घेणारे रुग्ण, अवयव प्रत्यारोपण झालेले रुग्ण गृह विलगीकरणाकरिता पात्र राहणार नाहीत. वयोवृध्द रुग्ण ,(६० वर्षापेक्षा जास्त वय असलेले) उच्चरक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, जुनाट यकृत/फुफुस/मुत्रपिंडाचे रुग्ण ,गरोदर माता, इ. रुग्णांची तपासणी वैद्यकीय अधिकारी यांनी केल्यानंतरच सदर रुग्णांना गृहविलगीकरणाची परवानगी देण्यात येईल. तसेच कोरोनाबाधित रुग्णांच्या घरी जर गरोदर माता, कर्करोग रुग्ण असतील तर असे रुग्ण गृह विलगिकरणासाठी पात्र राहणार नाहीत.

घरी दिवस रात्र (२४x७) काळजी घेणारी व्यक्ती उपलब्ध असावी. संबंधित काळजीवाहू व्यक्तीचे वय २५ ते ५० असावे व उपचार देणारे रुग्णालय यांच्यामध्ये संपर्क व्यवस्था (दुरध्वनी/मोबाईल) उपलब्ध असणे अनिवार्य आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार काळजीवाहू व्यक्ती व सर्व निकट संपर्कातील व्यक्तींनी प्रोटोकॉलनुसार हायड्रॉक्सी क्लोरोक्विन मात्रा घ्यावी.

मोबाईलवर "आरोग्य सेतू" अँप डाऊनलोड करावे व ते सतत ऍक्टिव्ह (Bluetooth/wi-fi व्दारे) असेल याविषयी दक्ष रहावे (Link-https://www.mygov.in/aarogya-setu-app/)
रुग्णांनी स्वतःची काळजी घेणे व नियमितपणे प्रकृतीबाबत पाठपुराव्याविषयी जिल्हा सर्वेक्षण अधिकारी/सर्वेक्षण पथकास माहिती देणे अनिवार्य आहे. रुग्णाने स्वतःचे गृह विलगीकरण करण्याविषयी प्रतितज्ञापत्र भरुन द्यावे व सर्व मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे. प्रतिज्ञापत्र दिल्यानंतर सदर व्यक्तिस गृह विलगीकरणासाठी पात्र ठरविण्यात येईल. उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी गृह विलगीकरणासाठी अनुमती देण्यापूर्वी तपासणी करावी. निकट सहवासितांना घरी करावयाच्या विलगीकरणासाठी (Home Qurantine) सविस्तर मार्गदर्शक सुचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. (Link-https://www.mohiw.gov.in/)

वैद्यकीय मदत कधी घ्यावी?
रुग्णाने स्वत: व काळजीवाहू व्यक्तींनी त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवावे. खालीलपैकी कोणतीही गंभीर लक्षणे आढळून आल्यास त्वरीत वैद्यकीय मदत घ्यावी. धाप लागणे श्वासोच्छवासास अडथळा निर्माण होणे. ऑक्सीजन सॅचुरेशनमध्ये कमतरता (SpO२<९५%) छातीमध्ये सतत दुखणे, वेदना होणे, संभ्रमावस्था,शुध्द हरपणे अस्पष्ट वाचा, झटके हात किंवा पायामध्ये कमजोरी किंवा बधीरता ओठ,चेहरा निळसर पडणे

आरोग्य यंत्रणेची जबाबदारी
जिल्हा आरोग्य यंत्रणा सर्व रुग्णांचे संनियंत्रण करेल. प्रत्येक ५ रुग्णांच्या मागे डेडीकेटेड कोविड हॉस्पीटल (DCH) मधील एक परिचारीका संपर्कात राहील व दूरध्वनीवर काळजीवाहकाकडून घेतलेली माहिती कार्यवाहीकरीता तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांना देतील. गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या प्रकृतीचे संनियंत्रण कार्यक्षेत्रातील सर्वेक्षण चमू प्रत्यक्ष भेटीव्दारे करतील तसेच कॉल सेंटरव्दारे त्यांचा पाठपुरावा करतील. रुग्णाच्या प्रकृतीची नोंद (शरीराचे तापमान, नाडीचा दर आणि ऑक्सीजन सॅच्युरेशन) कार्यक्षेत्रातील आरोग्य कर्मचारी/कॉल सेंटरमधील कर्मचारी हे ठेवतील.

आरोग्य कर्मचारी रुग्णांना; नातेवाईकांना प्रकृतीच्या स्वपरिक्षणाबाबत मार्गदर्शन करतील व सुचना देतील. गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांची माहिती कोविड-१९ पोर्टल व फॅसिलिटी अँप यावर अपलोड करतील.

सोबतच जिल्हयातील वरिष्ठ अधिकारी याचे सनियंत्रण करतील. रुग्णाने नियमाचा भंग केल्यास, (घराबाहेर पडल्यास ) किंवा रुग्णाला अधिक उपचाराची गरज भासल्यास सदर रुग्णाला कोविड रुग्णालयात संदर्भित करतील. कुटुंबातील सर्व सदस्य व निकट संपर्कातील व्यक्ती या सर्वांची तपासणी व सनियंत्रण मार्गदर्शक सुचनांनुसार करण्यात येईल.

सविस्तर वाचा - राजकारण : शिवसेनेत काँग्रेसी कल्चरचा शिरकाव; निष्ठावंतांमध्ये अस्वस्थता, वाचा

गृह विलगीकरण कधीपर्यंत?
गृह विलगीकरणात ( होम आयसोलेशन) ठेवलेल्या व्यक्तीस लक्षणे सुरु झाल्यानंतर १० दिवसांनी आणि ३ दिवस ताप नसल्यास गृहविलगीकरणातून मुक्त करावे. त्यानंतर रुग्णाला पुढील सात दिवस गृहविलगीकरणात राहण्याबद्दल व प्रकृतीचे स्वपरिक्षण करण्याबद्दल सल्ला द्यावा. गृह विलगीकरणाचा काळ संपल्यानंतर परत कोविड-१९ साठी चाचणी करण्याची आवश्यकता नाही. आरोग्य पथक रुग्णाच्या घरी भेट देऊन, पडताळणी करुन गृहविलगीकरण संपल्याचे निर्देश देतील.

संपादन - स्वाती हुद्दार

loading image
go to top