अबब! सापाने गिळलेली अंडी आली बाहेर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

मूल (जि. चंद्रपूर) : तालुक्‍यातील गोवर्धन येथील एका शेतकऱ्याच्या घरी घोणस सापाने ठिय्या मांडून कोंबडीला दंश केला. तिच्या पिल्लांनाही संपविले आणि दहा अंडीही गिळंकृत केली. सापाच्या या रुद्रावताराने घाबरलेल्या शेतकरी एकनाथ पत्रू गेडाम यांनी मूल येथील वन्यजीव अभ्यासक आणि सर्पमित्र उमेश झिरे यांना बोलाविले. सर्पमित्र उमेश झिरे यांनी मोठ्या शिताफीने सापाला पकडले. त्यानंतर सापाने गिळलेली दहा अंडीही बाहेर काढली. या सापामुळे गेडाम यांचे नुकसान झाले. मात्र, झिरे यांनी घोणस सापाला पकडून कुटुंबीयांची भीती दूर केली. त्यानंतर त्यांनी मंगळवारी आठ विषारी सापांना पकडून जीवदान दिले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now! The snake's egg came out