आता क्रीडा स्पर्धा प्रवेशिका ऑनलाइन

सुधीर बुटे
शुक्रवार, 5 जुलै 2019

सुधीर बुटे  
काटोल,(जि. नागपूर) खेळ व क्रीडा संचालनालय पुणेद्वारे आयोजित शालेय क्रीडा स्पधेतील सर्व व्यवहार यावर्षीपासून "ऑनलाइन' पद्धतीने होणार आहेत. यासंबधी नागपूर विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथे "ऑनलाइन' प्रशिक्षण कार्यशाळा पार पडली. कार्यशाळेत नागपूर मनपा, नागपूर जिल्हा, शासनाने स्वीकृत सहभागी केलेल्या विविध खेळ, क्रीडा प्रकारातील संघटना प्रतिनिधी उपस्थित होते.

सुधीर बुटे  
काटोल,(जि. नागपूर) खेळ व क्रीडा संचालनालय पुणेद्वारे आयोजित शालेय क्रीडा स्पधेतील सर्व व्यवहार यावर्षीपासून "ऑनलाइन' पद्धतीने होणार आहेत. यासंबधी नागपूर विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथे "ऑनलाइन' प्रशिक्षण कार्यशाळा पार पडली. कार्यशाळेत नागपूर मनपा, नागपूर जिल्हा, शासनाने स्वीकृत सहभागी केलेल्या विविध खेळ, क्रीडा प्रकारातील संघटना प्रतिनिधी उपस्थित होते.
विभागीय क्रीडा उपसंचालक सुभाष रेवतकर यांनी ऑनलाइन क्रीडा संगणकीय प्रणालीचे उद्‌घाटन केले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, क्रीडा अधिकारी अभय महल्ले, उज्ज्वला लांडगेसह क्रीडाक्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
अकोला येथील क्रीडा अधिकारी श्‍याम देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. 2019-20 मध्ये होणाऱ्या 56 खेळांचे शालेय क्रीडा स्पर्धेकरिता खेळाडूंची नोंदणी, प्रवेशिका ऑनलाइन भरावे लागणार आहे. याकरिता प्रत्येक खेळाडूंची माहिती, खेळप्रकार, त्याचे नोंदणीशुल्कसुद्धा बॅंकेत चालान स्वरूपात भरावे लागणार आहे. याकरिता विशिष्ट संकेतस्थळ तयार करण्यात आले असून पारदर्शकता, पात्र खेळाडू आदी बाबी अधिक स्पष्ट होणार आहेत. बोगस खेळाडू, जन्मतारीखेत फेरबदल अशा नियमबाह्य बाबीला लगाम लागणार आहे. विशेष म्हणजे कागदी घोडे कमी होऊन कोठेही खेळाडूंची सत्य माहिती उपलब्ध राहणार आहे. या प्रणालीमुळे क्रीडा शिक्षकांची वारंवार क्रीडा कार्यालयातील ये-जा कमी होणार असून सर्व माहिती "ऑनलाइन' मिळणार असल्याने लाभदायक ठरणार असल्याचे देशपांडे यांनी मार्गदर्शनातून स्पष्ट केले. यामुळे क्रीडा शिक्षकांत उत्साह दिसून आला. नोंदणीचे संगणकीय प्रणालीमुळे उपस्थित शिक्षकांचे उद्‌भवणाऱ्या शंकाचे निरसन करण्यात आले.
अशी करावी लागणार नोंदणीप्रक्रिया-
स्पर्धा संकेतस्थळावर नोंदणीकरिता nagpur.mahadso.co.in! schoo. चा वापर करावा लागेल.
राज्यात सर्वप्रथम सत्र 2015-16 मध्ये
नाशिक जिल्ह्यात ही प्रणाली उपयोगात आली. त्यानंतर अकोला येथे 2016-17 त्यानंतर महाराष्ट्रात नागपूर येथे यावर्षीपासून ऑनलाइनप्रणाली येत आहे. प्रणालीचा वापर करताना स्कूल रजिस्ट्रेशन
शाळेचा udise no यूडायस नंबर, खेळाडू दाखल खारीज नंबर आदी माहिती भरून लॉगिन करावा लागेल. शाळेचा मेल आयडी, शाळा प्रकार आदी माहिती भरावी लागणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now the sports contest entry online