आता ड्रोनव्दारे होणार पिकांवर फवारणी

विनोद इंगोले
बुधवार, 16 मे 2018

अशी होईल फवारणी
या सादरीकरणाला उपस्थित एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ड्रोनव्दारे 15 लिटर किडनाशक फवारणी शक्‍य होईल. ड्रोनची बारा फुटापर्यंत उंची अपेक्षीत धरण्यात आली आहे. ड्रोनच्या माध्यमातून एक हेक्‍टर फवारणी अवघ्या साडेचार मिनीटात होणार आहे. राज्यात प्रायोगीक तत्वावरील या उपक्रमासाठी कृषी विभागस्तरावर ड्रोनची खरेदी केली जाणार आहे. विभागीय कृषी सहसंचालक स्तरावर हे ड्रोन राहतील. शेतकऱ्यांच्या शेतावर किडनाशक फवारणी करुन देण्याचे याअंतर्गंत प्रस्तावीत आहे, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले.

नागपूर : फवारणी दरम्यान विषबाधेमुळे गेल्या हंगामात राज्यात 40 पेक्षा अधिक शेतकरी, शेतमजूरांना जीव गमवावा लागला होता. येत्या हंगामात यावर नियंत्रणासाठी प्रायोगीकतत्वावर ड्रोनव्दारे फवारणी केली जाणार आहे.

दिल्लीस्थित कृषीभवनमध्ये या संदर्भाने आय.आय.टी. बंगळूरच्या विद्यार्थ्यांनी नुकतेच सादरीकरण केले. यवतमाळ जिल्हयात कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. त्यावर नियंत्रणासाठी शिफारसीत नसलेल्या रसायनांचे मिश्रण करुन त्याची फवारणी करण्यात आली. काही शेतकऱ्यांनी तर कापसाला शिफारसीत नसलेल्या किडनाशकाची फवारणी देखील केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले होते. अनियंत्रीत आणि शिफारसीत नसलेल्या किडनाशकाची फवारणी करणाऱ्या तब्बल 22 शेतकऱ्यांना एकट्या यवतमाळ जिल्हयात आपला जीव गमवावा लागला. राज्यात फवारणी दरम्यान विषबाधा होत मरणाऱ्यांची संख्या 40 पोचली. त्यानंतर विविध समित्यांचे गठण करुन त्या माध्यमातून विषबाधेमागील कारणांचा वेध घेण्याचे प्रयत्न झाले.

ड्रोनव्दारे प्रायोगीक तत्वावर फवारणी
आय. आय.टी. बंगळूरच्या विद्यार्थ्यांनी फवारणीसाठी ड्रोनच्या वापराचे तंत्रज्ञान विकसीत केले आहे. दिल्लीतील कृषी भवनमध्ये देशपातळीवरील कृषी अधिकाऱ्यांसमोर याचे सादरीकरण नुकतेच करण्यात आले. महाराष्ट्रात येत्या हंगामात ड्रोनव्दारे फवारणीची उपयोगीता तपासली जाणार आहे.

अशी होईल फवारणी
या सादरीकरणाला उपस्थित एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ड्रोनव्दारे 15 लिटर किडनाशक फवारणी शक्‍य होईल. ड्रोनची बारा फुटापर्यंत उंची अपेक्षीत धरण्यात आली आहे. ड्रोनच्या माध्यमातून एक हेक्‍टर फवारणी अवघ्या साडेचार मिनीटात होणार आहे. राज्यात प्रायोगीक तत्वावरील या उपक्रमासाठी कृषी विभागस्तरावर ड्रोनची खरेदी केली जाणार आहे. विभागीय कृषी सहसंचालक स्तरावर हे ड्रोन राहतील. शेतकऱ्यांच्या शेतावर किडनाशक फवारणी करुन देण्याचे याअंतर्गंत प्रस्तावीत आहे, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले.

Web Title: Now spray on crops that will be done by the drone