आता करा वाहतूक पोलिसांना "व्हॉट्‌सऍप' तक्रारी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जुलै 2016

नागपूर - शहरात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत, तसेच रस्त्यांची अवस्था बिकट आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीच्या समस्या निर्माण होतात. चौकात जॅम निर्माण होणे किंवा वाहतूक पोलिसांशी दोन-दोन गोष्टी होणे हे नित्याचेच आहे. मात्र, कुणी वाहनधारक वाहतूक पोलिसांच्या कार्यप्रणालीबाबत समाधानी नसेल, तर ते थेट पोलिस उपायुक्‍तांना व्हॉट्‌सऍपद्वारे तक्रार करू शकतात. त्यासाठी वाहतूक पोलिस विभागाने 09011387100 हा क्रमांक जारी केला आहे.

नागपूरकरांना वाहतूक व्यवस्थेविषयी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांमुळेदेखील अनेकदा रहदारीला अडथळा निर्माण होत असतो. वाहतूक विभागदेखील तुटपुंज्या कर्मचाऱ्यांद्वारे कुठे कुठे लक्ष देणार. असे असताना आता नागरिकांच्या तक्रारी तसेच वाहतुकीसंदर्भात सूचना वाहतूक विभागाने आमंत्रित केल्या आहेत. त्याकरिता नेहमीचा एक व्हॉट्‌सऍप क्रमांक शहर वाहतूक विभागामार्फत जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आता नागपूरकर व्हॉट्‌सऍप क्रमांकावर थेट सूचना व तक्रार करू शकतील. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व सुरक्षित राहावी तसेच वाहतुकीचे नियमन व नियंत्रण योग्य रीतीने व अतिजलदपणे करण्याच्या दृष्टिकोनातून वाहतूक कार्यालयाने सदर क्रमांक नागरिकांकरिता जाहीर केला आहे. या व्हॉट्‌सऍप क्रमांकाच्या आधारे नागरिक वाहतुकीच्या दृष्टीने करण्यात आलेल्या व उपाययोजना अथवा वाहतुकीसंदर्भात निर्माण होणाऱ्या अडचणींबाबत माहिती पाठविण्याचे अपेक्षित आहे. त्यामुळे नागरिकांनी सदर व्हॉट्‌सऍप क्रमांकाचा तसेच नो पार्किंग झोनमधून उचलण्यात आलेल्या दुचाकी वाहनांसदर्भात विचारपूस करण्याकरिता 0712/ 2566658 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सहायक पोलिस आयुक्‍त लांबट यांनी केले आहे.

Web Title: Now traffic police "vhotsaepa 'complaints