#SundayPositive : याला म्हणतात जिद्द... कोणतीही शिकवणी न लावता झाला उपजिल्हाधिकारी

upjilhadhikari
upjilhadhikari

आर्णी (जि. यवतमाळ) : अनंत अमुची ध्येयासक्‍ती अनंत अन आशा, किनारा तुला पामराला असे कोलंबसाच्या गर्वगीतात कुसुमाग्रज म्हणतात, त्याप्रमाणेच अडचणींवर मात करीत उच्च ध्येयाकांक्षा असलेल्या तरुणाने आपले ध्येय गाठले आणि आईवडीलांना कृतकृत्य केले.

आर्णी तालुक्‍यातील महाळुंगी येथे आजोळ असलेला विरेंद्र कैलासचंद्र जाधव उपजिल्हाधिकारी झाला. कष्ट मेहनत, जिद्द आणि काहीतरी करून दाखवण्याची क्षमता असलेल्या व्यक्तीला कोणीही कोणत्याही परिस्थितीत रोखु शकत नाही. हेच त्याने सिद्ध करून दाखवले. विरेंद्रचे वडिल पोलिस शिपाई आहेत. कोणत्याही शिकवणी वर्गाला न जाता मामाच्या मार्गदर्शनात व वडिलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी अपार मेहनत घेऊन त्याने यश संपादन केले.

आर्णी तालुक्‍यातील महाळुंगी येथील मुळ रहिवासी असलेले कैलासचंद्र जाधव यांनी नोकरीसाठी गाव आणि घर सोडले. बदली होईल तिथे जाऊ लागले. त्यांचे पत्नी इंदुमती, मुलगा विरेंद्र व मुलगी नितीका असे छोटे कुटुंब होते. मुलांनी चांगले शिक्षण घ्यावे व चांगले अधिकारी व्हावे हेच त्यांचे स्वप्न. मुलांना ते मार्गदर्शन करायचे. त्यांचे मार्गदर्शनच मुलांना चांगल्या पदावर घेऊन जाऊ शकले. मुलगी नितीका आय टी चे शिक्षण पूर्ण करून पुण्याला चांगल्या कंपनीत कार्यरत आहे.

विरेंद्रने सुद्धा दहावी, बारावीमध्ये मेरिटचे गुण मिळवले, नंतर बी टेक (केमिकल) पदवी प्राप्त केली. त्यानंतर एल अँण्ड टि कंपनीत एक वर्ष नोकरी करून एम टेक ची पदवी प्राप्त केली. या दरम्यान त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. तेव्हा यवतमाळ येथे स्थायिक होऊन मामाच्या मार्गदर्शनात विरेंद्र पुढे चालत राहिला. वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अधिकारी बनण्याची तयारी करू लागला. कोणताही शिकवणी वर्ग न लावता घरीच अभ्यास करू लागला.
सविस्तर वाचा - नागपुरात कोरोना सुसाट

राज्य सेवा परिक्षेची जाहिरात आली. विरेंद्रने अर्ज भरून प्रयत्नांना मामाच्या मार्गदर्शनाची जोड देत ही परिक्षा यशस्वी केली. आज त्याचा निकाल लागला व्हि जे च्या आरक्षित जागेमध्ये तो राज्यात दुसरा आला आहे. उपजिल्हाधिकारी या पदाकरिता तो पात्र ठरला आहे. ही बातमी त्याच्या आजोळी महाळुंगी येथे कळताच संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com