मिळाला आधार... आता आम्हीही होणार अधिकारी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

ग्रामीण तसेच दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याची इच्छा असते. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे चांगले शिक्षण घेता येत नाही. यामुळे गुणवत्ता असूनही शिक्षणापासून वंचित राहावे लागते. मात्र, बिर्ला ग्रुपकडून मिळालेल्या स्कॉलरशिपमुळे त्यांची ही समस्या सुटेल. 

यवतमाळ : ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात यावे, शिक्षणाचे नवे मार्ग त्यांना मिळावे, यासाठी झरीजामणी तालुक्‍यातील मुकुटबन परिसरातील 30 विद्यार्थ्यांना बिर्ला ग्रुपची स्कॉलरशिप देण्यात आली. 

ग्रामीण तसेच दुर्गम भागातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाप्रती मोठी आवड असते. शिक्षण कसे मिळेल यासाठी त्यांचा सतत प्रयत्न सुरू असतो. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना चांगले शिक्षण घेता येत नाही. गुणवत्ता असूनही शिक्षणापासून वंचित राहावे लागते. पर्यांय नसल्याने काही विद्यार्थी मोल मजुरीचा मार्ग निवडतात. तर काही कामे करून शिक्षण पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असतात. मात्र, दोन्ही कामे करणे काही शक्‍य होत नाही. 

अशाच विद्यार्थ्यांची शिक्षणाप्रतीची आवड पाहून बिर्ला ग्रुपच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासत मुकुटबन परिसरातील 30 विद्यार्थ्यांची स्कॉलरशिपसाठी निवड करण्यात आली. या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दहा हजार रुपयांची स्कॉलरशिप दरवर्षी देण्यात देण्यात येणार आहे. ग्रुपच्या वतीने मुकुटबन परिसरातील इयत्या नववी व दहावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. 

Image may contain: 2 people, people standing
विद्यार्थिनीला दफ्तार देताना बिर्ला ग्रुपचे सदस्य 

बिर्ला ग्रुपच्या वतीने व एनएसडीएलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी सारथी स्कॉलरशिप पोर्टलचे उद्‌घाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बिर्ला ग्रुपचे युनिट हेड अभिजित दत्ता, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी मो. साबिर शेख, मुकुटबन येथील सरपंच शंकर काकडे ग्रुपचे राजेश सागर, सामाजिक कार्यकर्ता अरुंधती दत्ता, विद्यासारथी स्कॉलरशिप (मुंबई) येथील राजेश मिश्रा, अशीष गुप्ता, शिक्षण विस्तार अधिकारी शेंडगे उपस्थित होते. 

आमचे भविष्य सुधरेल 
आम्हाला शिकायचे आहे. मात्र, घरची परिस्थिती चांगली नसल्यामुळे अडचण येत होती. त्यामुळे काय करावे, कुणाला मदत मागावी असाच विचार मणात येत होता. मात्र, बिर्ला ग्रुपने आमची समस्या हेरून मदतीला धावून आले. त्यांनी दिलेल्या स्कॉलरशिपमुळे आशेचा किरण निर्माण झाला आहे. आता आमचे भविष्य उज्ज्वल असल्याचे दिसत आहे. याचा पुरेपुरे फायदा घेऊन शिक्षण घेऊ आणि मोठे अधिकारी बनू अशी भावना स्कॉलरशिप मिळालेल्या विद्यार्थ्यांनी व्यक्‍त केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now we will be officers