आता चाहूल जिल्हा परिषदेची ! मैदान राखण्यास राजकीय वर्तुळात हालचालीला सुरवात 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑक्टोबर 2019

टेकाडी, (जि. नागपूर) ः विधानसभा निवडणुकीचे शीतयुद्ध संपते तोच गावांगावात आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकांची चाहूल लागायला सुरवात झाली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत जिथे 

टेकाडी, (जि. नागपूर) ः विधानसभा निवडणुकीचे शीतयुद्ध संपते तोच गावांगावात आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकांची चाहूल लागायला सुरवात झाली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत जिथे 
भाजपसोबत थेट लढाईची मोर्चे बांधणी राजकीय पक्षांनी केली होती, ती मात्र विधानसभेच्या निकालानंतर कॉंग्रेस, शिवसेनासारख्या पक्षांनी आता हलक्‍यात घ्यायच्या चर्चांना सुरवात झालेली आहे. मात्र विधानसभा निवडणुकीत प्रहारची मुसंडी जिल्हा परिषद निवडणुकीतदेखील चुरशीची लढत आणणार असल्याची शक्‍यता नाकारता येत नाही. टेकाडी कांद्री जिल्हा परिषद सर्कलसाठी अनुसूचित जाती महिला तर पंचायत समितीवर देखील आरक्षण अनुसूचित जातीचे राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सध्या कांद्री, जुनीकामठी पंचायत समिती सर्व साधारण महिला राखीव असे मानले असता आपल्या अर्धांगिनीला तिकीट मिळावी, यासाठी वरिष्ठांकडे धावाधावीला सुरवात दिवाळीनंतर नक्कीच सुरू होईल. 
क्षेत्राचे आरक्षण अपेक्षित पडले नसल्यामुळे काही नेतेमंडळी नाराज असल्याचेही चित्र आढळत आहे. दरम्यान राजकारणात सक्रिय राहण्यासाठी दुस-या सर्कलमधून निवडणूक लढण्याचे धाडस काहींना करावे लागणार आहे, असेही स्पष्ट होवू लागले आहे. अनुसूचित जाती महिला चेह-यांना मोठी संधी की पतीरायांच्या राजकीय आलेखातील पुढा-यांच्या पत्नीला संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागल्याचे स्पष्टपणे लक्षात येत असून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक 
राजकीय पटलावर नवे प्रतिनिधी तयार करणार की पुन्हा सर्कलचे अदलाबदल करून सत्तासुख भोगण्यासाठी जुनेच चेहरे आपले राजकीय मोहरे घेऊन पुढे येणार, हा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे. 

गणित बिघडण्याची शक्‍यता 
गोंडेगाव-साटक जिल्हा परिषद सर्कलला प्रहार संघटनेची मुसंडी जोरदार काम करणार असल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. कारण टेकाडी अनुसूचित महिला राखीव असे आरक्षण निघण्याची दाट शक्‍यता असल्याने अनेक दिग्गजांना साटक सर्कलमधून नशीब आजमावे लागणार आहे. अश्‍यात विधानसभा निवडणुकीत जोरदार प्रदर्शनांनंतर प्रहार संघटन जिल्हा परिषद निवडणुकीत हात टाकणार. त्यामुळे चांगल्या चांगल्यांचे गणित बिघडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now Zhula zilla parishad!