परिचारिकांना "बायोमेट्रिक' हवे सोयीचे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

नागपूर - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) प्रशासनाने लागू केलेली बायोमेट्रिक हजेरी सक्तीची केली आहे. डॉक्‍टरांपासून तर लिपिकांपर्यंत सर्व कर्मचारी बायोमेट्रिक मशीनवर अंगठा लावतात. मेडिकलमधील परिचारिकांनाही बायोमेट्रिकचा विरोध नाही, परंतु त्यांच्यासाठी नर्सिंग वसतिगृहात बायोमेट्रिक यंत्र लावण्यात यावे, अशी मागणी पुढे आली आहे. 

मेडिकल प्रशासनाने बायोमेट्रिक यंत्र लावताना डॉक्‍टरांसाठी अधिष्ठाता कक्षाजवळ बायोमेट्रिक यंत्र लावून दिले. बीएससी नर्सिंगच्या पाठ्यनिर्देशकांसाठी (ट्यूटर) त्यांच्याच कार्यालयाच्या आवारात बायोमेट्रिक यंत्र लावले. लिपिकांसाठीही हे यंत्र त्यांच्या कार्यालयाजवळ लावण्यात आले. परंतु, परिचारिकांना नर्सिंग वसतिगृहात वाहन पार्किंग केल्यानंतर बायोमेट्रिक यंत्रावर हजेरी लावण्यासाठी पायी मेडिकलमध्ये यावे लागते. यामुळे परिचारिकांची प्रचंड गर्दी होते. सकाळी साडेसात वाजता पहिल्या शिफ्टमध्ये येणाऱ्या परिचारिकांना यावे लागते. यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण होते. परिचारिकांना काही मिनिट उशीर झाल्यामुळे त्यांच्या परिचारिकांच्या वेतनातून मोठी कपात करण्यात येत असल्याने विदर्भ नर्सेस फेडरेशनच्या पदाधिकारी यांनी मेडिकल प्रशासनाला निवेदन दिले. वारंवार निवेदन दिल्यानंतरही याची दखल घेत नसल्याने परिचारिकांमध्ये असंतोष आहे. 

संघटनेच्या राज्याच्या सरचिटणीस प्रभा भजन, विदर्भ शाखेच्या अध्यक्ष कल्पना विंचुरकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात येईल, असेही सांगण्यात आले. 

आम्ही बायोमेट्रिक हजेरी पद्धतीच्या विरोधात नाही. वैद्यकीय संचालक कार्यालयातून आलेल्या आदेशाचाही आम्ही सन्मान करतो. परंतु, अनेक परिचारिका कामावर रुजू होत असताना नर्सिंग वसतिगृहात गणवेश बदलतात. अशावेळी उशीर होतो. प्रसंगी वेतन कापले जाते. डॉक्‍टर, ट्युटर, लिपिकांच्या सोयीनुसार बायोमेट्रिक लावले. परिचारिकांसाठी नर्सिंग होस्टेलमध्ये यंत्र लावून द्यावे. अन्यथा परिचारिका अंगठा लावणार नाही. लवकर आंदोलन करण्यात येईल. 
तनुजा वाटकर-घोडमारे, कार्याध्यक्ष, विदर्भ नर्सेस फेडरेशन, नागपूर 

Web Title: Nurses need biometrics