निम्न पेढी प्रकल्पाच्या घळभरणीत स्थलांतराचा अडथळा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

अमरावती : खारपाणपट्ट्यातील राज्यातील पहिल्याच प्रकल्पाच्या घळभरणीत बुडीत क्षेत्रातील गावांच्या स्थलातरांचा अडथळा आहे. भूसंपादन नवीन नियमानुसार करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली असून मोबदला मिळाल्याशिवाय गाव सोडणार नाही, अशी आग्रही भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे.
प्रचंड विरोध व समर्थन अशा दुहेरी भूमिका सहन करीत खारपाणपट्ट्यातील निम्न पेढी प्रकल्पाची मुहूर्तमेढ वर्ष 2008 मध्ये आघाडी सरकारच्या कारकिर्दीत रचण्यात आली. तत्कालीन राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख व विधान परिषद सदस्य प्रा. बी. टी. देशमुख यांनी या प्रकल्पाचे जोरदार समर्थन केले होते.

हा प्रकल्प होऊ नये यासाठी कृती समितीने जोरदार विरोध करीत मोर्चे, आंदोलनेही केलीत. खारपाणपट्ट्यात या प्रकल्पाचा सिंचनासह पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग होणार नाही. केवळ गावकऱ्यांचे विस्थापन होईल, सुपीक जमिनी बुडतील, असा त्यांचा आक्षेप होता. हा आक्षेप मोडून काढत प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली. तापी नदीच्या खोऱ्यातील पूर्णा नदीच्या उपखोऱ्यात भातकुली तालुक्‍यात पेढी नदीवर हा प्रकल्प आकारास येत आहे. 1102 चौरस किलोमीटर पाणलोट क्षेत्र असलेल्या या प्रकल्पाची जलसंचय क्षमता 75.27 दलघमी असून 12,230 हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. प्रकल्पासाठी 2500 हेक्‍टर जमीन संपादित करण्यात आली असून पाच गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न मात्र कायम आहे. बुडीत क्षेत्रात येणाऱ्या अळणगाव, गोपगव्हाण, हातूर्णा, कुंड सर्जापूर व कुंड खुर्द या गावांतील 1750 कुटंबांचे स्थलांतर अद्याप शिल्लक आहे. 2013 -14 च्या नवीन भूसंपादन कायद्यानुसार वाढीव मोबदला मिळावा, अशी त्यांची मुख्य मागणी आहे.
किंमत वाढली
वर्ष 2004 मध्ये मंजुरी मिळालेल्या निम्न पेढी प्रकल्पाची मूळ किंमत 161 कोटी 17 लाख इतकी होती. 1 सप्टेंबर 2016 ला मिळालेल्या द्वितीय प्रशासकीय मान्यतेत या प्रकल्पाची किंमत 1639 कोटींवर पोहोचली. वर्ष 2015 मध्ये या प्रकल्पाचा समावेश प्रधानमंत्री किसान सिंचन योजनेत झाला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Obstacle to migration of low-generation projects