पत्नी, चिमुकल्यास मारहाण करणाऱ्यावर पतीविरुद्ध गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

भिवापूर  (जि.नागपूर ): पत्नी तिच्या मैत्रिणीच्या मोबाईलवरून दुसऱ्यासोबत बोलत असल्याचे बघून संतापलेल्या पतीराजाने काठीने पत्नी आणि सहा वर्षांच्या मुलास जबर मारहाण केली. पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली. ही घटना गुरुवारी सकाळी येथील दिघोरा वस्तीत घडली. शैलेश बोरकर (वय 38) असे आरोपी पतीचे नाव आहे. शैलेश हा संशयी स्वभावाचा असल्याचे समजते. गत बुधवारी सायंकाळी शैलेश बाहेरून घरी आला असता त्याची पत्नी तिच्या मैत्रिणीच्या मोबाईलवरून बोलताना आढळली. त्यामुळे संशय येऊन त्याने कुणासोबत बोलल्याचे पत्नीकडे विचारणा केली. बहिणीसोबत बोलल्याचे पत्नीने सांगितले.

भिवापूर  (जि.नागपूर ): पत्नी तिच्या मैत्रिणीच्या मोबाईलवरून दुसऱ्यासोबत बोलत असल्याचे बघून संतापलेल्या पतीराजाने काठीने पत्नी आणि सहा वर्षांच्या मुलास जबर मारहाण केली. पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली. ही घटना गुरुवारी सकाळी येथील दिघोरा वस्तीत घडली. शैलेश बोरकर (वय 38) असे आरोपी पतीचे नाव आहे. शैलेश हा संशयी स्वभावाचा असल्याचे समजते. गत बुधवारी सायंकाळी शैलेश बाहेरून घरी आला असता त्याची पत्नी तिच्या मैत्रिणीच्या मोबाईलवरून बोलताना आढळली. त्यामुळे संशय येऊन त्याने कुणासोबत बोलल्याचे पत्नीकडे विचारणा केली. बहिणीसोबत बोलल्याचे पत्नीने सांगितले. परंतु संशयी स्वभावाच्या शैलेशचा पत्नीच्या सांगण्यावर विश्वास बसला नाही. त्याने रागात येऊन पत्नीशी भांडण करून मारहाण केली. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा त्याने पत्नीला शिवीगाळ करून मारहाण केली. स्वतःचा बचाव करण्यासाठी पत्नीने घराच्या आत शरण घेत आतून दार बंद केले. शेलेशने तिला दार उघडण्यास सांगितले. परंतु तिने दार उघडले नाही. त्यामुळे अधिकच संतापलेल्या शैलेशने अंगणात उभ्या असलेल्या त्याच्या सहा वर्षांच्या लोकेश नामक मुलाला काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. मुलाच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून त्याचा बचाव करण्याकरिता पत्नी दार उघडून घराबाहेर आली असता शैलेशने तिलाही काठी व लाथाबुक्‍क्‍याने जबर मारहाण केली. या मारहाणीत मायलेकांना पाय, कमर, पोट व पाठीवर गंभीर जखमा झाल्यात. या घटनेची तक्रार पत्नीने पोलिसात नोंदविली असून विनोद झाडे पुढील तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Offense against husband against beating wife, wife