बायकोच्या मंगळसूत्राची किंमत विचारल्याने अधिकाऱ्यांना बेदम चोप

Beating
Beating

नागपूर - सामाजिक  व आर्थिक सर्वेक्षण करताना नागिरकाला त्याच्या बायकोच्या मंगळसूत्राची किंमत विचारणे सांखिकी अधिकाऱ्यांना चांगलेच महाग पडले. आगाऊ प्रश्‍न विचारत असल्याने बोगस अधिकारी असावे अशी शंका आल्याने नागरिकांनी दोघांचे हातपाय बांधून बेदम चोप दिला. रक्तबंबाळ झालेला एक अधिकारी पळत अजनी पोलिस ठाण्यात पोचल्याने पुढचा अनर्थ टळला. 

शुक्रवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास सुटा-बुटात आणि शर्टला टाय लावून दोन सर्वेक्षण अधिकारी अजनीतील न्यू ज्ञानेश्‍वरनगरात पोहचले. त्यांच्या हाती काही फॉर्म्स होते. ते एका व्यक्‍तीच्या घरी गेले. त्यांना आयकार्ड दाखवले. 

दोन महिलांशी इंग्रजीत संवाद सुरू केला. नाव, गाव, पत्ता विचारून झाल्यावर त्यांच्या पतीदेवांना त्यांनी ‘तुमच्या बायकोचे मंगळसूत्र किती ग्रॅमचे आहे?’ विकले तर किती किंमत येईल असे प्रश्‍न विचारले. त्यामुळे दोघांचेही डोके भडकले. एकाने घरातून दोरी आणली आणि दुसऱ्याने दोघांचेही हात बांधून झोडपणे सुरू केले. दोन्ही अधिकाऱ्यांनी गयावया सुरू केली. शासनाचे अधिकारी असल्याचे सांगित होते. मात्र दोघांनीही त्याकडे दुर्लक्ष करून त्यांची बेदम धुलाई केली. रक्‍तबंबाळ झालेल्या एका अधिकाऱ्याने कशीबशी सुटका करून पळतच अजनी पोलिस स्टेशन गाठले. लगेच पोलिस कर्मचाऱ्यांना घेऊन सहकाऱ्याची सुटका केली. पोलिसांनी या प्रकरणी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला. मारहाण करणाऱ्या दोन्ही युवकांना अटक केली. 

शिशपाल रामफलसिंह शोकल (वय २४) आणि प्रवीण पाल (वय ३४) हे दोघे केंद्र शासनाच्या सांख्यिकी नियम व कार्यान्वय मंत्रालय प्रतीदश सर्वेक्षण कार्यालय क्षेत्र विभागात अधिकारी आहेत. सीजीओ कॉम्पलेक्‍स येथील कार्यालयात दोघेही सांखिकी अधिकारी म्हणून कार्यरत आहे. गेल्या काही दिवसांपासून केंद्र शासनाच्या उपक्रमानुसार प्रत्येक नागरिकांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण करीत आहेत. शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता ज्ञानेश्‍वर नगरातील अजय सुरेशप्रसाद कमकर (वय ३६) आणि शेजारी राहुल सुभाष प्रसाद (वय ३६) यांच्या घरी गेले होते.

पैसे हिसकण्याचा प्रयत्न 
अधिकाऱ्यांना बांधल्यानंतर त्यांच्या बॅगची झडती घेतली. त्यांचे खिसे तपासले. ते कुणालातरी लुटमार करून येथे आल्याचा आरोप करीत त्यांना पुन्हा मारहाण केली. त्याचे पैसे हिसकले आणि एटीएम कार्ड पाहून पैसे काढून मागितले. त्यांचे अर्जही फाडून फेकून दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com