वृद्ध शेतकऱ्याची पत्नीसह आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

कर्जबाजारी पणा व नापिकीला कंटाळून वृध्द शेतकऱ्यासह त्याच्या पत्नीने आत्महत्या केल्याची घटना शेगाव तालुक्यातील पहुरजिरा येथे (ता.13) ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली.
 

खामगाव - कर्जबाजारी पणा व नापिकीला कंटाळून वृध्द शेतकऱ्यासह त्याच्या पत्नीने आत्महत्या केल्याची घटना शेगाव तालुक्यातील पहुरजिरा येथे (ता.13) ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली.

शेगाव तालुक्यातील पहुरजिरा येथील रहिवासी शेतकरी दिनकर सुरडकर यांनी 13 ऑगस्ट रोजी आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. तर त्यांची पत्नी सौ.रुख्मिणी सुरडकर यांनी विषारी औषध प्राशन करुन आपले जीवन संपविले.

शेजारील नागरिकांनी घरात जावून पाहले असता दोघा पती पत्नीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. शेतकरी दिनकर सुरडकर यांच्याकडे दिड एकर शेती असून त्यांच्यावर बँकेचे कर्ज होते. सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे समजते. तर घरघुती वादातून ही आत्महत्या झाल्याचीही चर्चा गावात सुरु होती.

घटनेची माहिती मिळताच शेगाव ग्रामीण पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास पोलिस करीत आहेत. त्यांच्या पश्चात 02 मुली असून मुलींचे लग्न झालेले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: old age Farmer Suicide with his wife