अन् त्या वृद्धेला मिळाले पुन्हा आपले घर... 

शशांक देशपांडे
शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018

दर्यापूर (अमरावती) : जन्मदात्री वृद्ध आई अचानक हरवल्याने व शोध घेऊन हतबल झालेल्या मूर्तिजापुरातील लाडे कुटुंबियाना दर्यापुरातील टायगर ग्रुपच्या युवकांनी आधार देत वृद्ध आईला शोधून पुन्हा घरी आणल्याने कुटुंबियाना अश्रु अनावर झाले होते. 

सावित्रीबाई शिवाजीराव लाडे (वय 78, रा मूर्तिजापूर) ही वृद्ध महिला उजाडताच बनोसा दर्यापुरातील बाराखोल्या परिसरात हनुमान मंदिराच्या पायऱ्यांवर बसलेली काहींना आढळली. संपूर्ण दिवस कुणाशीही न बोलता ती वृद्ध महिला मंदिरात बसून होती, संध्याकाळी परिसरातील काही महिलांनी म्हातारीला उरलेसुरले खाण्यास आणून दिले. मात्र तिने कशाला ही हात लावला नाही.

रात्र झाली व पुन्हा दिवस उजाडला मात्र महिला त्याच ठिकाणी बसून होती. परिसरातील लोकांनी तिची चौकशी करणे सुरू केले. कुठुन आली, नाव काय, गाव कोणते असे प्रश्न विचारले. मात्र कोणालाही उत्तर मिळाले नाही. ती म्हातारी कुणाशीही बोलली नाही अनं बघितले ही नाही

हळूहळू ही गोष्ट आसपासच्या परिसरात पसरली लोक बघायला येऊ लागले, ओळखण्याचा प्रयत्न करू लागले, पण काही पत्ता लागत नव्हता. येथील टायगर ग्रुप या सामाजिक कार्य करणाऱ्या युवकांना ही बातमी समजली. त्यांनी महिलेशी बोलायचा प्रयत्न केला, काय घडले कुणास ठाऊक पण महिला अचानक बोलली. "माझा नातू कुठय?, सुनबाई जेवली का?, मुलगा कामावरुन आला का? असे प्रश्न विचारु लागली. अखेर टायगर ग्रुपच्या युवकांनी हा तुझ्या नातवाचा मित्र असल्याची बतावणी करत तिला बोलके करायचा प्रयत्न केला, महिलेने त्या युवकाला जवळ घेत विचारपुस केली, घर कुठंय म्हणून सांगितले, मूर्तिजापुरातील पत्ता सांगितला. 

लाडे कुटुंबिय म्हातारीचा सर्वत्र शोध घेत होते. पोलिसात तक्रार ही देण्यात आली होती. चिंतामग्न कुटुंबिय हवालदील झाले होते. एव्हाना टायगर ग्रुपच्या सदस्यांनी मूर्तिजापुरातील मित्रांना फोन करून या पत्त्यावर पाठविले होते. म्हातारीची ओढ लागलेल्या कुटुंबियांना संदेश पोहोचला होता. बोलणे झाले म्हातारीच्या घरची मंडळी दर्यापुरात पोहोचली होती. मंदिरात बसून सतत रडत असलेल्या आईकडे बघून मुलगा, सून आणि नातू यांना अश्रु अनावर झाले. 

टायगर ग्रुपच्या अनिकेत उन्नतकर, सौरभ पिंपलकर, जयेश गोरले यांचे आभार मानत लाडे कुटुंबियानी वृद्ध महिलेला परत नेले.

Web Title: that old lady got her family back

टॅग्स