esakal | पूजन सामग्री विसर्जित करताना वृद्धाचा नदीपात्रात बुडून मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

old man died in a river basin at Amravati

साबळे हे नदीच्या काठावर गेले असता अचानक त्यांचा पाय घसरून पाण्यात बुडून प्रवाहासोबत वाहत केले. पुरुषोत्तम भगवान साबळे (वय ३६) यांनी भातकुली पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने नदीपात्रात शोधकार्य सुरू केले. पुराच्या पाण्याचा ओघ कमी झाल्यानंतर दिवाकर साबळे यांचा मृतदेह गावातील नदीपात्रात गणोरी मार्गावरील बांधाजवळ सायंकाळी अडकलेला दिसला.

पूजन सामग्री विसर्जित करताना वृद्धाचा नदीपात्रात बुडून मृत्यू

sakal_logo
By
संतोष ताकपिरे

अमरावती : जिल्ह्यातील गणोजादेवी ते गणोरी मार्गावरील नदीपात्रात पूजासामग्री विसर्जित करण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा बुडून मृत्यू झाला. शनिवारी (ता. २२) ही घटना घडली. दिवाकर काशिराम साबळे (वय ६०, रा. कानफोडी, ता. भातकुली) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी हरितालीकेचे पूजन केल्यानंतर पूजासामग्री वाहत्या पाण्यात विसर्जित करण्याची परंपरा आहे. त्याचा एक भाग म्हणून गणोजादेवी येथील महिला नदीकाठी पूजासामग्री विसर्जित करण्यासाठी शनिवारी (ता. २२) जमल्या होत्या. संततधार पावसामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. वाहत्या पाण्याचा दाब वाढत असल्याने त्याठिकाणी आलेल्या एका महिलेने त्यांच्या जवळचे पूजासाहित्य विसर्जित करण्यासाठी दिवाकर साबळे यांच्या हाती दिले.

अधिक माहितीसाठी - कोरडी आत्महत्येच्या निमित्ताने! हे काही आयुष्यावर फुली मारण्याचे वय नव्हते

साबळे हे नदीच्या काठावर गेले असता अचानक त्यांचा पाय घसरून पाण्यात बुडून प्रवाहासोबत वाहत केले. पुरुषोत्तम भगवान साबळे (वय ३६) यांनी भातकुली पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने नदीपात्रात शोधकार्य सुरू केले. पुराच्या पाण्याचा ओघ कमी झाल्यानंतर दिवाकर साबळे यांचा मृतदेह गावातील नदीपात्रात गणोरी मार्गावरील बांधाजवळ सायंकाळी अडकलेला दिसला. भातकुली पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे.

संपादन - नीलेश डाखोरे