Video : जीवापेक्षा मोठा झाला पैसा...वृद्धापुढे आली हात परसरण्याची वेळ

Old man lost both legs in accident, have mo money for treatment
Old man lost both legs in accident, have mo money for treatment

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुका आपल्याला माहित आहे. इथे बाबा आमटे यांचे "आनंदवन' हे कुष्ठरुग्णांचे सेवाकेंद्रही आहे. या ठिकाणाहून सेवेचा संदेश जगभरात जात आहे. देशविदेशात हे ठिकाण प्रसिद्ध आहे. जगभरातील लोक हे सेवाकेंद्र बघायला येतात. सेवाकेंद्र असलेल्या अशा या शहरात सेवा तर दूरच साधी माणुसकीही दाखवू नये, अशी एक घटना घडली. माणुसकी लाजेल, अशीच ही घटना...

सुभाष अपीला नन्नावरे हे साठ वर्षे वयाचे अत्यंत गरीब व्यक्ती. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील बोनथाळा येथे राहणारे. या वयातही हातमजुरी करून पोट भरणारे. कोरोनामुळे काम मिळेनासे झाले. त्यांच्यावर भीक मागण्याची वेळ आली. "काय करावे', या विवंचनेतच त्यांनी एक दिवस सायकल काढली आणि ते वरोऱ्याला जायला निघाले. "वरोऱ्याला जेवणाची व्यवस्था होईल का? घरच्यांसाठी भाकर नेता येईल का', हा विचार त्यांच्या मनात होता. मनात विचारांचे आणि पायाने सायकलीचे चक्र फिरत होते... आणि अचानक "धाड्‌ ऽऽऽऽ' असा आवाज झाला. काही कळण्याच्या आतच ते धाडकन फेकले गेले. त्यापुढचे काय झाले, हे त्यांना कळले नाही.

सुभाषरावांना शुद्ध आली, तेव्हा सारे अंग दूखत होते. भोवलात काही ओळखीतले काही अनोळखी लोक उभे होते. शेजारी नजर टाकताच, काय घडले असावे, हे त्यांना कळले. त्यांच्या दोन्ही पायांना "प्लास्टर' बांधलेले होते. वेदना होत असल्यामुळे ते विव्हळायला लागले. एका टू व्हिलरने त्यांना जबर धडक दिली. त्यात ते कोसळले. त्यांचे दोन्ही पाय तुटले. अंगालाही बऱ्याच जखमा झाल्या. दैव बलवत्तर म्हणून प्राण वाचले....प्राण तर वाचले, परंतु, आता पुढचे सारेच जीवघेणे...?

सरकारी हॉस्टिपल सांगते बाहेरू घ्या औषधी..

चंद्रपूरच्या मेडिकल हॉस्पिलटमध्ये गेल्या पंधरादिवसांपासून सुभाषराव "ऍडमिट' आहेत. हॉस्पिटलमध्ये इतर खर्च नसला तरी औषधांचा खर्च मोठा आहे. आजवर दहाएक हजार रुपयांची औषधे हॉस्पिटलबाहेरून आणावी लागली. मेडिकल हॉस्पिटलमध्येच सर्व औषधे मिळावीत, असा नियम आहे. परंतु, कोणत्याच मेडिकल हॉस्पिटलमध्ये सर्व औषधे उपलब्ध नसतात. याही हॉस्पिटलमध्ये अशीच स्थिती. सुभाषरावांसाठी दहा हजार रुपये म्हणजे भली मोठी रक्कम. उधारी, उसनवारी, सावकारांकडून काही घे. असे करून त्यांच्या नातेवाईकांनी पैसे जमवले. परंतु, आता पुढील इलाजासाठी पैसाच उरला नाही. आता पुढे काय करावे? हा प्रश्‍न त्यांना छळत आहे.

पोलिस रिपोर्ट घेत नाहीत

या अपघाताची तक्रार वरोरा पोलिस स्टेशमध्ये केली असता, तक्रार घ्यायला पोलिस तयार नाहीत. पंधरा दिवसांपासून तक्रार घेतली नाही. तक्रार दाखल केली असती तर "टू व्हिलर'वाल्याकडून हॉस्पिटलचा खर्च तरी केला असता. सायेब जीवापेक्षा पैसा मोठा झाला का? टू व्हिलरवाल्याला काय जीव नाही का? गरीबाची त्याले हाय लागणार नाही का? पोलिसायनं आमची तक्रार घ्यावी. "टू व्हिलर'वाल्यानं फक्त आम्हाले खर्च भरून द्यावा. बाकी आमचं काहीच म्हननं नाही, अशी कळकळीची विनंती, सुभाषरावाची बहीण, तसेच राजेश शेरकुरे आणि नातेवाईक करीत आहेत.

आयुष्यमान भारत योजना कुठे गेली ?

राजेश शेरकुरे हा एक ओळखीचा सामाजिक कार्यकर्ता सुभाषरावांसाठी धडपड करत आहे. सुभाषरावांच्या बहीण म्हणाल्या, ""सायेब कुठून आनावं पैसे. दुधाले, जेवाले पैसे नाही. दवाखान्यासाठी कुठून आनावं?'' सामाजिक कार्यकर्ते बबनराव गोरामन यांनी अत्यंत हळहळ व्यक्त केली. ""आयुष्यमान भारत योजना कुठे गेली? अत्यंत गरीबीत जगणारे लोक कुठून पैसा आणणार? आता त्या म्हाताऱ्या माणसाचे पाय गेले? त्याच्या जीवनाचे पुढे काय होणार? त्याला निराधार योजनेतून पैसा मिळायला हवा.''
-बबनराव गोरामन
सामाजिक कार्यकर्ते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com