वाघाच्या हल्ल्यात वृद्ध ठार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

मूल (जि. चंद्रपूर) : वाघाच्या तावडीत सापडलेल्या बोकडाला सोडविण्यासाठी गेलेल्या वृद्धाला वाघाने ठार केले. ही घटना तालुक्‍यातील कवडपेठ येथे शुक्रवारी (ता. 4) घडली. मृताचे नाव संतोष विठ्ठल लेनगुरे (वय 60) असून तो कवडपेठ येथील राहणारा होता. ही घटना कम्पार्टमेंट नंबर 751 मध्ये घडली.

संतोष लेनगुरे यांचे शेतशिवाराला लागूनच झोपडीवजा घर आहे. तेथे गाई, बैल आणि बकऱ्या बांधल्या जातात. शुक्रवारी सायंकाळी जनावरांना चारून आणल्यानंतर एक बोकड मागेच राहिला होता. त्याला आणण्यासाठी लेनगुरे परत गेले असता शेताजवळच वाघाने बोकडावर झडप घातली होती. त्याला वाघाच्या तावडीतून सोडवीत असताना वाघाने संतोष लेनगुरे यांच्यावरच हल्ला करून त्यांना ठार केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Older killed in tiger attack