दीड दशक दिमाखात उभा पिलर आडवा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

नागपूर - गेल्या दीड दशकापासून छत्रपतीनगर चौक उड्डाणपूलाचा दिमाखात भार सहन करणाऱ्या पाच पिलरपैकी एक पिलर आडवा करण्यात मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या पथकाला यश आले. इतर चारही पिलरवर अद्याप उड्डाणपुलाच्या कोसळलेल्या स्लॅबचा मलबा असल्याने आज काही पिलर डायमंड क्रशरने काप करून पाडण्यात येणार आहेत.

नागपूर - गेल्या दीड दशकापासून छत्रपतीनगर चौक उड्डाणपूलाचा दिमाखात भार सहन करणाऱ्या पाच पिलरपैकी एक पिलर आडवा करण्यात मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या पथकाला यश आले. इतर चारही पिलरवर अद्याप उड्डाणपुलाच्या कोसळलेल्या स्लॅबचा मलबा असल्याने आज काही पिलर डायमंड क्रशरने काप करून पाडण्यात येणार आहेत.

दरम्यान, दिवसभरात साईमंदिर परिसरातील उड्डाणपुलाच्या रॅम्पचा मलबा हटवून रस्त्याचा बहुतांश भाग मोकळा करण्यात आला. चौथ्या दिवशी जवळपास ७२ टक्के काम पूर्ण झाल्याचे मेट्रो रेल्वेचे कार्यकारी अभियंता गौरव श्रीवास्तव यांनी सांगितले.  रात्री डायमंड क्रशरने उड्डाणपुलाच्या मध्यभागी असलेल्या पिलरला कापण्यात आले. एका पिलरला शनिवारी सकाळी कॉम्बिक्रशरच्या साहाय्याने आडवे करण्यात आले. त्यामुळे आता चार पिलर शिल्लक असून, यावर तूर्तास उड्डाणपुलाचे तुटलेले स्लॅब पडले आहे. त्यामुळे उड्डाणपुलाच्या स्लॅबचे कॉम्बिक्रशरच्या साहाय्याने तुकडे करण्यात येत आहे. स्लॅबचे तुकडे केल्यानंतर चारही पिलर मोकळे होणार असून, त्यानंतर डायमंड क्रशरने काप करून पाडण्यात येणार आहे. ही प्रक्रिया रविवारी होण्याची शक्‍यता आहे. दरम्यान,  दिवसभरात साईमंदिर परिसरातील उड्डाणपुलाच्या रॅम्पवरील माती काढण्यात आली. यात मोठे दगडही आढळून आले. हा संपूर्ण मलबा ट्रकच्या साहाय्याने येथून हटविण्यात आला. त्यामुळे रस्त्यांचा बहुतांश भाग मोकळा झाला असून, उद्या सायंकाळपर्यंत छत्रपतीनगर चौकापर्यंतचा मार्ग पंधरा वर्षापूर्वीप्रमाणे दिसून येईल. रेडिसन ब्ल्यू हॉटेलच्या दिशेने असलेल्या रॅम्पवरील मातीही काढणेही सुरू असून, हा रॅम्पही उद्या जमीदोस्त होण्याची शक्‍यता आहे. 

व्हिडिओ रेकॉर्डिंग
उड्डाणपूल पाडण्याचे काम बघण्यासाठी चौथ्या दिवशीही अनेकांनी हजेरी लावली. प्रत्यक्ष कामापासून शंभर मीटर अंतरावरून बघ्यांनी आजही पिलर पाडण्याचा क्षण मोबाईल कॅमेऱ्यात बंदिस्त केला. काहींनी पिलर पाडण्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले.

Web Title: One and a half decades of standing Pilar Flat parade