दीड लाखाचे सोने उडविले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जुलै 2019

वणी (जि. यवतमाळ) : सोन्याचे दागिने साफ करण्याची बतावणी करून दोन महिलांचे दीड लाखांचे दागिने उडविले. ही घटना शनिवारी (ता.20) दुपारी दीडला शास्त्रीनगरात घडली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

वणी (जि. यवतमाळ) : सोन्याचे दागिने साफ करण्याची बतावणी करून दोन महिलांचे दीड लाखांचे दागिने उडविले. ही घटना शनिवारी (ता.20) दुपारी दीडला शास्त्रीनगरात घडली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
सिंधू रामदास रामटेके (वय 42), संगीता गणेश लोखंडे (वय 25) या महिला घरी असताना तिघे दुचाकीने शास्त्रीनगरात आले. एका कंपनीकडून आल्याचे त्यांनी सांगितले. पितळ, तांब्याचे भांडे साफ करण्याचे एक लिक्विड दाखविले. सोन्याचे दागिने साफ करून मिळेल, अशी बतावणी केली. सुरुवातीला महिलांना तांबे व पितळेचे भांडे साफ करून दाखविले. महिलांनी गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने साफ करण्यासाठी दिले. महिलांचे दागिने एका डब्यात हळद पाणी व लिक्विड टाकून गॅसवर ठेवण्यास सांगितले. आणखी दुसऱ्या व्यक्तीचे सोने साफ करावयाचे आहे, अशी थाप मारून ते तिन्ही भामटे पसार झाले. महिलांनी डब्बा उघडून बघितला असता त्यातील सोने गायब झाल्याचे आढळून आले. महिलांनी आरडाओरड करून तिघांचा शोध घेतला. मात्र, तोपर्यंत ते पसार झाले होते. घटनेची माहिती वणी पोलिसांना मिळताच डीबी पथकाने घटनास्थळ गाठून पंचनामा केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One and a half lakhs of Gold is blown