कत्तलीसाठी जनावरे नेणाऱ्याला अटक

अनिल दंदी
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

कत्तल करण्यासाठी चालवलेल्या तीन गोवंशासह टाटा एस गाडी उरळ पोलिसांनी पकडली. सुमारे 1 लाख 65 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अकोला: कत्तल करण्यासाठी चालवलेल्या तीन गोवंशासह टाटा एस गाडी उरळ पोलिसांनी पकडली. सुमारे 1 लाख 65 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

उरळ ठाणेदार सतिश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास गायगावकडून पारस येथे एक व्यक्ती कत्तलीच्या इराद्याने टाटा एस या वाहनातून तीन गोवंशाना घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. हे वाहन पकडण्यासाठी पारस निमकर्दा मार्गावर सापळा लावण्यात आला. रात्री अकरा वाजताच्या सुमारास पारसच्या दिशेने येणारी गाडी येताना दिसली. पोलिसांनी सदरची गाडी थांबवायला सांगितले. या गाडीमध्ये चालकासह तीन गोवंश होते. 

पोलीसांनी गाडीत काय आहे विचारले असता चालकाने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर वाहनाची पाहणी केली असता आतमध्ये तीन गोवंश भरून वाहतूक चालू होती. पोलिसांनी तीन गोवंशासह एक टाटा एस वाहन  असा 1 लाख 65 हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून चालक युवराज लक्ष्मण गवई रा. जुने शहर अकोला याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: One arrested for the Cow slaughter in akola