लाचखोर अधिष्ठात्यांना नागपूरमध्ये अटक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जानेवारी 2017

नागपूर - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज मेयो रुग्णालय परिसरात सापळा रचून लाचेची मागणी करणाऱ्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये-वाहने यांना तसेच लाचेची रक्कम स्वीकारणारा नर्सिंग होस्टेलचा मेसचालक विजय मिश्रा याला अटक केली. पंधरा हजारांच्या लाचेसाठी दोघेही एसीबीच्या जाळ्यात अडकले. कारवाई करणाऱ्या पथकाच्या माहितीनुसार मेयो रुग्णालयात औषध पुरवठ्यासाठी जुलै 2015 मध्ये निविदा काढण्यात आली होती. या प्रकरणातील तक्रारकर्ता असलेल्या औषध पुरवठादारानेसुद्धा निविदा भरली होती. सर्वांत कमी किमतीची निविदा असल्याने त्यांना कंत्राट मिळाले.

नागपूर - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज मेयो रुग्णालय परिसरात सापळा रचून लाचेची मागणी करणाऱ्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये-वाहने यांना तसेच लाचेची रक्कम स्वीकारणारा नर्सिंग होस्टेलचा मेसचालक विजय मिश्रा याला अटक केली. पंधरा हजारांच्या लाचेसाठी दोघेही एसीबीच्या जाळ्यात अडकले. कारवाई करणाऱ्या पथकाच्या माहितीनुसार मेयो रुग्णालयात औषध पुरवठ्यासाठी जुलै 2015 मध्ये निविदा काढण्यात आली होती. या प्रकरणातील तक्रारकर्ता असलेल्या औषध पुरवठादारानेसुद्धा निविदा भरली होती. सर्वांत कमी किमतीची निविदा असल्याने त्यांना कंत्राट मिळाले. त्यांनी डिसेंबर - 2016 मध्ये हिवाळी अधिवेशनादरम्यान उपयोगासाठी औषधसाठा उपलब्ध करून दिला. या औषधांचे एकूण दोन लाख 94 हजार 660 रुपयांचे बिल त्यांनी मेयो रुग्णालयातील अधिष्ठाता कार्यालयात 28 डिसेंबर रोजी सादर केले. बिल मंजूर करण्यासंदर्भात तक्रारकर्त्यांनी मीनाक्षी वाहने यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी बिल मंजूर करण्यासाठी 15 हजारांच्या लाचेची मागणी केली. 

Web Title: one arrested in Nagpur

टॅग्स