पुसदमध्ये वाहनातून एक कोटी जप्त

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016

नागपूर- यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे एका वाहनातून एक कोटी रुपयांची रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली. यात पाचशे व एक हजाराच्या जुन्या चलनातील नोटा आहेत. यामुळे या रकमेबद्दल संशय निर्माण झाला आहे.

पुसद नगर परिषदेची रविवारी (ता. 27) निवडणूक आहे. या निवडणुकीसाठी पोलिसांचा बंदोबस्त वाढला आहे. वाहनांची तपासणी करताना एक कोटी रुपयांची रोख रक्कम पोलिसांच्या हाती लागली. या सर्व नोटा जुन्या चलनातील 500 व 1000 च्या आहेत. या रकमेचा हिशेब ती नेणाऱ्यांना देता आला नाही.

पुसदमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री मनोहर नाईक यांच्या पत्नी अनिता नाईक नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे ही निवडणूक मनोहर नाईक यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. ही रक्कम वाशीम अर्बन बॅंकेची असल्याची प्राथमिक चौकशीत सांगितले गेले. यामुळे ही रक्कम निवडणुकीसाठी वापरण्यासाठी केली जाणार होती काय? या दिशेने पोलिस तपास करीत आहेत. या संदर्भात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

Web Title: One crore recovered from Pusad