खासगी बस उलटून 1 ठार, २१ प्रवासी जखमी 

संजय सोनोने
रविवार, 29 एप्रिल 2018

घटनेची माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. बहुतांश जखमी प्रवासी अकोल्यातील रहिवासी आहेत. जागेश्वरी यात्रा कंपनीची ही खासगी बस असल्याचे ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार शेख यांनी सांगितले.

खामगाव (जि. बुलडाणा) : पुण्यावरून अकोल्याला जाणारी खासगी लक्झरी बस उलटून रविवारी पहाटे 5.30 वाजता चिखली खामगांव या मार्गावर खामगांव शहरानजीक अपघात झाला. यामध्ये एक प्रवासी ठार, एक गंभीर तर 21 प्रवासी जखमी झाले. अपघातातील जखमींना खामगाव सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृतकाची ओळख अद्याप पटली नाही.

पुण्यावरून अकोला मार्गे अमरावतीकडे जाणारी लक्झरी बस रविवारी पहाटे साडे पाचच्या दरम्यान खामगाव शहरानजीक समोरील टायर फुटल्याने अपघात झाला. सदर बस हि भरधाव वेगात असताना उलटली. यामध्ये १ प्रवाशी जागीच ठार तर २१ प्रवाशी जखमी झाले. यातील ५ प्रवाश्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता अकोला येथे हलविण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. बहुतांश जखमी प्रवासी अकोल्यातील रहिवासी आहेत. जागेश्वरी यात्रा कंपनीची ही खासगी बस असल्याचे ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार शेख यांनी सांगितले.

Web Title: one dead in accident near khamgaon