शौच्छास गेला अन बिबट्याचा शिकार झाला; जागीच मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 डिसेंबर 2018

- रामदेगी- संघरामगिरी येथील घटना 
- वर्षभरातील वाघाचा दुसरा बळी

चिमूर- ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागुन असलेल्या बफरझोनमधील कक्ष क्रमांक 60 मधील विदर्भातील प्रसिद्ध तिर्थस्थळ पर्यटन असलेल्या संघरामगिरी-रामदेगी येथील खेळणीच्या दुकानावर कामाकरिता असलेला युवक शौच्छास गेला असता बिबट्याचा शिकार झाला. हि घटना सोमवारी सकाळी अकरा वाजता घडली मृतकांचे नाव संजय अरुण तिसरे (38 वर्ष) असे आहे.

रामदेगी- संघरामगिरीला हिंदू धर्मियांसह बौद्ध धर्मियांची आस्था लाभली आहे.  या ठिकाणी वर्षभर पर्यटकांची गर्दी असते. डिसेंबर महीन्यात दर सोमवारी या ठिकाणी जत्रा भरत असल्यामुळे भाविकांची मोठी गर्दी असते. घनदाट जंगलव्याप्त असलेल्या या भागात मोठया प्रमाणात वन्यप्राण्यांचा वावर असून नेहमी दर्शन होत असते. येथील अनेक ठिकाणी वनविभागाने निर्बंध लादले असताना अनेकजण नियम डावलून बंदी असलेल्या ठिकाणी वावरतात. अशीच बंदी असलेल्या कक्ष क्र.60 मध्ये येथील स्थानिक व्यावसायिकांच्या दुकानांवर कामावर असलेला संजय तितरे हा व्यक्ती सोमवारी सकाळी अकरा वाजता शौच्छासाठी गेला होता दरम्यान दबा धरून असलेल्या बिबट्याने त्याच्यावर पाठी मागून हल्ला करीत जागीच ठार केले आहे.

वर्षभरात या बिबट्याने व्यक्तीवर हल्ला चढविल्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी मे महिन्यात रामदेगीमध्ये पहाटेच्या वेळात झोपेत असलेल्या व्यावसायिकांवर जीवघेणा हल्ला केला होता. या घटनेने परिसरात बिबट्याची दहशत पसरली असून नागरिक भयभीत आहेत. याकडे वनविभागाने लक्ष देन्याची गरज आहे. बिबट्याच्या बंदोबस्त करावा अशी स्थानिक व्यावसायीक व नागरिकांनीची मागणी आहे.

मदतीची मागणीसाठी तणाव
 मृतकाचा कुटूबीयांना वनविभागाने त्वरित आर्थिक मदत करावी व नंतर घटनेचा पंचनामा करावा असा पवित्रा उपस्थित नागरिकांनी घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Web Title: One death in leopard attack