अक्षय तृतीयेच्या दिवशी शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 एप्रिल 2018

खामगाव: साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी शेतकऱ्याने गळफास घेवून जीवन संपविले. कर्जबाजारी असल्याने या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे समजते.

प्राप्त माहीतीनुसार, खामगाव तालुक्यातील खोलखेड येथील सोपान नामदेव घोराडे (६६) या शेतकऱ्याने  त्यांच्या राहत्या घरातील पाळण्याच्या दोरीला गळफास घेऊन आत्महत्या केली.

आज सकाळी ५:३० वाजता ही घटना उघडकीस आली. सोपान घोराडे यांच्यावर महाराष्ट्र बँकेचे कर्ज असल्याचे नातेवाईक सांगतात. कर्जबाजारीपणातून या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची माहिती आहे.

दरम्यान ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी जावून प्रेत उत्तरीय तपासणी करिता खामगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. ऐन अक्षय तृतीयेच्या दिवशीच शेतकऱ्याने जीवन संपविल्याने खोलखेड गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: One farmer commit suicide in Maharashtra