एकाला लागला करंट, दुसरा पायऱ्यांवरून पडला, तिसऱ्याचा चिरला ओठ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

मकरसंक्रातीच्या दिवशी पतंगीचा नाद तिघांवर बेततल्याचे दिसून आले अनेकजण जखमी असून, उपचार सुरू आहेत. 

अकोला  ः संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर लहानग्यांसह मोठ्यांनी शहरात पतंग उडवून आनंदोत्सव साजरा केला. मात्र, या आनंदोत्सवात अनेकांवर ‘संक्रात’ आल्याचे चित्र बुधवारी (ता.15) दिसून आले. बुधवारी विजेच्या खांबावर अडकलेला पतंग काढताना एका बालकाला शॉक लागला तर एक 11 वर्षीय मुलगा पायऱ्यांवरून पडला. सोबतच एका व्यक्तीचा मांजामुळे ओठ चिरला. यासोबतच आणखी चार जण मांजाने दुखापतग्रस्त झाल्याची माहिती समोर येत आहे. जखमींवर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Image may contain: one or more people and people standing

बहुतांश ठिकाणी बंदी असलेला चिनी व नायलॉन मांजा वापरण्यात येत असल्यामुळे यंदा मांजा कुणाच्या जिवावर ‘संक्रांत’ आणणार, असा प्रश्‍न अकोलेकरांना पडला होता. त्याचे पडसाद बुधवारी दिसून आले. धोकादायक मांजाची छुप्या पद्धतीने सर्रास विक्री झाल्याने अनेकांनी तो खरेदीही केला. विशेष म्हणजे यंदा चायना मांजा विक्रीवर वनविभाग, महापालिका व पोलिस प्रशासनाकडून एकही कारवाई करण्यात आली नाही. शहरात डिसेंबरपासून शहरात चायना मांजाचे पतंग उडविल्याचे दिसून आले. आतापर्यंत यामध्ये चार पक्षी या चायना मांजाने जखमी झाल्याची माहिती आहे. मात्र, मकरसंक्रातीच्या दिवशी हाच चायना मांजा बालकांसाठी जीवघेणा ठरला.

Image may contain: one or more people and outdoor

हे झाले जखमी
रिधोरा येथील आदित्य नागेश दंदी (वय 11) हा मुलगा पगंत उडविताना पायऱ्यांवरून पडल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी तत्काळ सर्वोपचारमध्ये दाखल केले होते. सोबतच जुने शहरातील हरीहरपेठ येथील नऊ वर्षीय बालक सोहम अरुण खरात हा विजेच्या खांबावर अडकलेला पतंग काढताना त्याला जबर विजेचा धक्का लागला. त्याच्यावर सध्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. तर कृष्णा खंडू वाळसे यांचा मांजामुळे ओठ चिरला आहे.सोबतच चार रुग्ण मांजामुळे दुखापतग्रस्त झाल्याची माहिती आहे.

Image may contain: one or more people and outdoor

पतंग पकडण्यासाठी जीवघेणी कसरत
कटलेला पतंग पकडण्यासाठी काही मुले रस्त्यावर धावत असल्याचे दिसून आले. यामध्ये वाहनचालकांनी प्रसंगावधान दाखवत वाहन थांबविले. मात्र, मुले दिवसभर रस्त्यावर वाहनाना न जुमानता धावत होती. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One fell on the current, the other fell on the steps, the third had a broken lip