esakal | सोयाबीन काढणीला जाणं जीवावर बेतलं; वाहन उलटून एक ठार, १३ जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

accident

सोयाबीन काढणीला जाणं जीवावर बेतलं; अपघातात एक ठार, १३ जखमी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सावली (जि. चंद्रपूर) : सावली येथील महाकाली नगरीजवळ (saoli chandrapur) वाहनाचा अपघात होऊन १ ठार, तर १३ मजूर जखमी झाले. हे सर्व मजूर उपरी येथील असून सोयाबीन काढणीच्या कामासाठी बुलडाणा (buldana) जिल्ह्यात पिकअप वाहनाने जात होते. मात्र, रस्त्यात वाहून उलटून अपघात (saoli labour accident) झाला. ही घटना गुरुवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली.

हेही वाचा: २१ दिवसांचा संसार पाण्यात बुडाला, नवदाम्पत्याला एकाच सरणावर निरोप

हेही वाचा: खासदार गवळींना वर्षा बंगल्यावर नो एंट्री? गेटवरूनच परतल्या माघारी

लताबाई टिकाराम थोरात (55) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. तालुक्यातील शेतीच्या हंगामाची कामे संपत आलेली आहेत. त्यामुळे तालुक्यातील मजूरवर्ग कुटुंबाचा उदर निर्वाह चालविण्यासाठी परप्रांतात व परजिल्ह्यात सोयाबीन काढणीच्या कामासाठी जातात. उपरी येथील 14 मजूर त्याच गावातील पिकप वाहनाने बुलडाणा जिल्ह्यात सोयाबीन काढणीच्या कामासाठी निघाले होते. वाहन भरधाव वेगाने जात असताना सावली येथील महाकाली नगरजवळ समोरून दुसरे वाहन आले. त्यावेळी वाहन बाजूला घेण्याच्या नादात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला उलटले. त्यात लताबाई टिकाराम थोरात यांचा मृत्यू झाला, तर संगीता जगदीश रोहणकर (35), सुरज टिकाराम थोरात (23), पुरुषोत्तम बोदलकर (50), पुष्‍पाबाई पुरुषोत्तम बोदलकर (45), रोशन दिवाकर कोठारे (30), नीलिमा रोशन कोठारे (28), जनार्धन तुकाराम कुडकर (45), उषा सातपुते (45) स्वामीना जगदीश रोहणकर (19) विकेश चोखाजी बारसागडे (28) संजय बाजीराव भोयर (43) रामचंद्र सातपुते (52) ललिता बाळू कोटगले (40) असे जखमी झाले. सर्वांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. परंतु, चार मजुरांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शिरसाट यांच्या मार्गदर्शनात पीएसआय चिचघरे, दीपक जाधव करीत आहे.

loading image
go to top