यवतमाळ जिल्हा सीमेवर एक लाखाची रोकड जप्त

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

कुंभा (जि. यवतमाळ) : यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या कोसारा (ता. मारेगाव) पॉइंटवर एक लाख दोन हजार रुपयांची रोकड कारमधून जप्त करण्यात आली. मारेगाव येथील पोलिस व महसूल विभाग यांच्या संयुक्त पथकाने शनिवारी (ता. 5) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास नाकाबंदी सुरू असताना ही कारवाई केली.
विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे, कुठेही अवैध दारू व पैशांचा पुरवठा होऊ नये, यासाठी मारेगाव तालुक्‍यातील अंतिम टोकावर असलेल्या कोसारा येथे वाहनांची तपासणी करण्यासाठी नाका देण्यात आला आहे. निवडणूक विभाग व पोलिस प्रशासनातर्फे तालुक्‍यातील कोसारा येथे नाकाबंदी लावण्यात आली.

दरम्यान, शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आय 20 कारने (क्रमांक एमएच 21-व्ही 9879) हसन रजा शेख हे माजरी येथून मारेगावला येताना कोसारा पॉइंटवर त्याच्या वाहनाची तपासणी केली. त्यांच्याजवळ एक लाख दोन हजार रुपयांची रोकड आढळून आली. मारेगावचे पोलिस निरीक्षक जगदीश मंडलवार, उपनिरीक्षक अमोल चौधरी, महसूल विभागाचे मंडळ अधिकारी शेळके, वरठे आदी कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One lakh cash seized at Yavatmal district border