आणखी एका कोरोना बाधित महिलेचा मृत्यू! जिल्ह्यात मृतांचा आकडा 15

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

 स्थानिक अलहिलाल कॉलनी येथील ५६ वर्षीय महिलेचा जिल्हा कोविड रुग्णालयात शनिवारी (ता. २३) पहाटे मृत्यू झाला. प्रकृती अस्वास्थ्यतेच्या कारणाने महिलेस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २१ मे रोजी तिचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

अमरावती :  कोरोनाबाधितांचा आकडा दररोज वाढतो आहे. सोबतच कोरोनामुळे होणा-या मृत्यूचा आकडाही वाढतो आहे. आजच्या घटनेनंतर मृतांचा आकडा 15 झाला आहे.
 स्थानिक अलहिलाल कॉलनी येथील ५६ वर्षीय महिलेचा जिल्हा कोविड रुग्णालयात शनिवारी (ता. २३) पहाटे मृत्यू झाला. प्रकृती अस्वास्थ्यतेच्या कारणाने महिलेस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २१ मे रोजी तिचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

सविस्तर वाचा - सावली सोडणार तुमची साथ 

संबंधित महिलेची प्रकृती नाजूक असल्याने तिला जीवनरक्षक प्रणालीवर (व्हेंटिलेटर) ठेवण्यात आले होते. आज तिचा मृत्यू झाल्याची पुष्टी जिल्हाधिकाऱ्यांनी  केली. जिल्ह्यात कोरोनामुळे मृतांचा आकडा १५ झालेला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One more death of corona, count raised to 15

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: