स्वाइन फ्लूचा आणखी एक बळी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 एप्रिल 2017

नागपूर - स्वाइन फ्लू यावर्षी विदर्भात स्थिरावला आहे. उपराजधानीत पुन्हा एकदा स्वाइन फ्लूची दहशत आहे. स्वाइन फ्लूच्या मृत्यूसंख्येत पुन्हा वाढ झाली. उपचारारम्यान एक महिला दगावली. स्वाइन फ्लू मृतांचा आकडा 13 वर पोहोचला असून विविध खासगी रुग्णालयात चार जण स्वाइन फ्लूच्या बाधेने अत्यवस्थ झाले आहेत. त्यांची प्रकृती नाजूक असल्याचे सांगण्यात येत आहे. चौघे व्हेंटिलेटरवर आहेत. विशेष असे की, 13 मृत्यूंपैकी 8 स्वाइन बाधितांचे मृत्यू खासगी रुग्णालयात झाले आहेत. 

पोलिस लाइन टाकळी परिसरातील ही महिला आहे. लकडगंज येथील न्यू इरा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. स्वाइन फ्लूची लक्षणे आढळल्याने त्यांच्या घशातील द्रवाचे नमुने एसआरएल डायग्नोस्टिक या खासगी लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविले. दरम्यान, 18 दिवसांपासून टॅमी फ्लू गोळ्यांचा डोस सुरू केला. स्वाइन फ्लूची लक्षणे आढळल्याने आतापर्यंत 800 वर संशयितांच्या घशातील द्रवाच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यात चालू वर्षात आतापर्यंत 54 जणांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यभर आतापर्यंत अवघ्या तीन महिन्यांत 117 हून अधिक रुग्ण दगावले आहेत. त्यापैकी 53 मृत्यू पुणे विभागातील आहेत. त्या खालोखाल नाशिक विभागात 23 तर आणि नागपूर विभागात 13 जण दगावले आहेत. 

औषधी 19 दुकानांत 
स्वाइन फ्लू या आजाराबाबत जनतेने सतर्क राहावे. आजाराची लक्षणे दिसताच तपासणी करावी. स्वाइन फ्लू या रोगावरील औषधी 19 औषधी दुकानांत उपलब्ध आहे. नुकतेच जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या कार्यालयात जनतेच्या माहितीसाठी मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले आहे. 

आढावा बैठक 
सर्दी, पडसा, खोकला आणि ताप असल्यास इंदिरा गांधी वैद्यकीय रुग्णालयात (मेयो) स्वाइन फ्लूचे नमुने तपासण्यात येतात. 0712-275421 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी आढावा बैठकीत सांगितले. आढावा बैठकीत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. उमेश नावाडे उपस्थित होते. 

Web Title: one more victim of swine flu