दीड हजारात दिला एक पेपर

file photo
file photo

अमरावती : विद्यापीठातील पेपर फूटप्रकरणी अनेक जण रडारवर आहेत. पेपर लिक केल्यानंतर प्रत्येक पेपरसाठी विद्यार्थ्यांकडून दीड हजार रुपये या टोळीने वसूल केल्याची कबुली अटकेनंतर आशीष राऊत याने फ्रेजरपुरा पोलिसांपुढे दिली. त्या दोघांच्या घराची झडती पोलिसांनी घेतली.
तपास अधिकाऱ्यांनी दोघांकडून त्यांनी पेपरफुटीच्या माध्यमातून जमविलेल्या रकमेपैकी सहा हजार रुपयांची रोखसुद्धा जप्त केली. फ्रेजरपुरा पोलिसांच्या कोठडीत असलेल्या आशीष श्रीराम राऊत (वय 28, रा. बोर्डी, ता. अकोट) व निखिल अशोक फाटे (वय 27, रा. गाडगेनगर, अमरावती) या दोघांनी अभियांत्रिकीचा मॅकेनिक याच विषयाचा पेपर लिक केला नसून, अन्य चार विषयांचे पेपर अशाच पद्धतीने लिक केल्याची कबुली दिली. मॅकेनिकल-1 (एम 1), इंजिनिअरिंग मॅकेनिक्‍स (ईएमआय), इलेक्‍ट्रिकल टेलिकम्युनिकेशन व नेटवर्क एनालिसीस या विषयांच्या पेपरचाही त्यात समावेश असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या प्रकरणात संमती अभियांत्रिकी महाविद्यालयाचा लिपिक ज्ञानेश्वर बोरे अद्याप पसार आहे. आशीष, निखिल व बोरे या त्रिकुटाने पेपरफुटीच्या माध्यमातून लाखो रुपयांची कमाई केली. मात्र केवळ सहा हजार रुपये जप्त करण्यात आले. उर्वरित रक्कम त्यांनी मौजेवर खर्च केल्याचे सांगितले. फाटे हा शहरातील कोचिंग क्‍लासच्या संचालकाचा भाऊ आहे.
चौघे पोलिसांच्या रडारवर
दोघांनाही जिल्हा न्यायालयाने शुक्रवारपर्यंत एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. त्यांना शुक्रवारी (ता. 14) पुन्हा न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली, असे उपनिरीक्षक राजू लेवटकर यांनी सांगितले. या कटात सहभागी असलेल्या अन्य चौघांची नावे पोलिस कोठडीदरम्यान दोघांनी सांगितले. त्यामुळे ते चौघे पोलिसांच्या रडारवर आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com