esakal | धक्कादायक! तक्रार मागे घेण्यासाठी एका व्यक्तीने पोलिसालाच मागितली ५० हजारांची खंडणी
sakal

बोलून बातमी शोधा

file photo


एखाद्या प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी भल्या भल्या व्यक्तीला खंडणी मागण्याचे आपण समाजात ऐकले आहे. पण खुद्द एका पोलिस शिपायालाच एका व्यक्तीने ५० हजार रुपयांची खंडी मागितल्याची घटना पुसद पोलिस ठाण्यांतर्गत उघडकीस आली आहे. त्यामुळे या घटनेने पोलिस ठाण्यात खळबळ उडाली आहे.

धक्कादायक! तक्रार मागे घेण्यासाठी एका व्यक्तीने पोलिसालाच मागितली ५० हजारांची खंडणी

sakal_logo
By
कैलाश जगताप

पुसद (जि. यवतमाळ) : एखाद्याची अडवणूक करून खंडणी मागण्याचा प्रकार आपण समाजात अनेक प्रतिष्ठितांसोबत झालेला ऐकून आहो. परंतु खुद्द पोलिसाचीच केलेली तक्रार मागे घेण्यासाठी तब्बल ५० हजारांची खंडणी एका महाभागाने मागितल्याचा अनोखा प्रकार येथील शहर पोलिस ठाण्याअंतर्गत उघडकीस आला आहे.

गजानन कोरबा कुरुडे (वय २८, रा. बोरी (खू.)) असे खंडणी मागणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे, तर शुभम गणेश कुकडे हा त्याचा साथीदार आहे. या दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

जाणून घ्या  : आजारातून बरे होण्याची संपूर्ण यंत्रणा आपल्या शरीरातच! जाणून घ्या कोविड रुग्णांसाठी प्राणायाम

पोलिस शिपायाचीच केली तक्रार

त्याचे झाले असे की, पोलिस शिपाई प्रशांत स्थूल यांनी गेल्या १५ दिवसांपूर्वी गजाननवर एका प्रकरणात कारवाई केली होती. त्यामुळे या कारवाईची खुद्द गजाननने एलसीबीकडे प्रशांत स्थूल यांची तक्रार केली होती. या तक्रारीचा निपटारा करण्यासाठी गजाननने चक्क पोलिसालाच ५० हजारांच्या खंडणीची मागणी केली. त्यामुळे आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

हेही वाचा : यवतमाळ जिल्ह्यात 'येळकोट येळकोट जय मल्हार'चा गजर; 70 वर्षांपासून प्रलंबित आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक

पोलिस वर्तुळात खळबळ

या प्रकरणी प्राप्त तक्रारीवरून शहर पोलिसांनी गजानन व शुभम या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने पोलिस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.


(संपादन : दुलिराम रहांगडाले)

loading image
go to top