चंद्रपूरमध्ये पोलिस उपनिरीक्षकाला दारू तस्कराने चिरडले

चंद्रपूरमध्ये पोलिस उपनिरीक्षकाला दारू तस्कराने चिरडले

चंद्रपूर : दारूची अवैध वाहतूक करणार्‍या तस्कराने आज (मंगळवार) पहाटे पोलिसाला चिरडले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या पोलिसाचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला.

छत्रपती चिडे असं या पोलिसाचं नाव असून, ते नागभीड पोलीस ठाण्यात कार्यरत होते.

पहाटे चार वाजताच्या सुमारास मौशी चोरगावजवळ पेट्रोलिंग करीत असताना भरधाव आलेल्या वाहनाने त्यांना उडवले. या वाहनात अवैध दारू असल्याची माहिती असल्यानं पोलीस या मार्गावर तैनात होते.

जखमी पोलीस चिडे यांचा ब्रम्हपुरी येथील एका रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने अवैध दारुविक्रेत्यांची दादागिरी कशी वाढत चालली, हेही दिसून आलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com